जागतिक कॅन्सर दिवसा निमित्त मोफत कॅन्सर निदान आणि उपचार शिबीर
अमळनेर येथे आधार बहुउद्देशीय संस्था,लायन्स क्लब आणि ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि 4 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजे पासून दुपारी 2 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे जागतिक कॅन्सर दिवासानिमित्त मोफत कॅन्सर निदान आणि उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर तपासणी शिबिरात तपासणी आणि उपचार जळगाव चे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ निलेश चांडक आणि इतर सहकारी तज्ञ डॉ करणार आहेत.

या शिबिरात तोंड व घशाच्या कॅन्सरची लक्षणे,जिभेच्या कॅन्सर ची लक्षणे,स्वरयंत्र आणि अन्न नलिका कॅन्सरची लक्षणे इ विषयासंबंधी देखील माहिती दिली जाणार आहे
तसेच स्तनाचे वाढते प्रमाण,उपाययोजना, लक्षणे,शस्त्रक्रिया समज गैरसमज, बिनटाक्याची बायास्पी ,केमोथेरपी परिणाम आणि समज,प्लास्टिक सर्जरी द्वारे स्तनांचे प्रत्यारोपण,गरजेनुसार रसायन उपचार इ विषयांवर देखील मार्गदर्शन केले जाणार आहे.
गर्भपिशवी कॅन्सर च्या आवश्यक चाचणी करण्याचे मार्गदर्शन आणि मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल.

अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या शिबिराचे सर्व अमळनेर तालुक्यातील जनतनेने लाभ घ्यावा असे आवाहन आधार संस्था,ग्रामीण रुग्णालय, लायन्स क्लब अमळनेर आयोजकांनी केले आहे.
संपर्क- 9960509619, 9764461428, 8805272800






