Maharashtra

Weather:गणरायाचे आगमन होणार पावसा सह..! पुणे मुंबई सह महाराष्ट्रात जोरदार पाऊस..!

Weather:गणरायाचे आगमन होणार पावसा सह..! पुणे मुंबई सह महाराष्ट्रात जोरदार पाऊस..!
यंदाचा गणेशोत्सव पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या पावसाने होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात पुणे, मुंबई, उपनगरांसह कोल्हापूर, कोकण, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांनी हवामान अदांज घेऊन बाहेर पडणे योग्य ठरणार आहे. (Mumbai Pune Rain)

दरम्यान पुणे जिल्ह्यात पावसासह उन्हाच्याही झळा बसण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये 30 डिग्रीच्या पुढे तापमान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिली आहे. 2 सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील दिवसाच्या सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. सर्वोच्च तापमान 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जे सरासरीपेक्षा 3 अंश सेल्सिअसने जास्त राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळी उच्च तापमानामुळे वादळी वारे, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर पुढच्या 48 तासांत तापमानात वाढ होऊन पावसाची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्याने 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जोरदार वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पुण्यात पुढच्या दोन दिवसांत साधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल असे पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button