योध्दा प्रमाणपत्राचा शहरात सुळसुळाट
प्रतिनिधी-आनंद काळे
बारामती- कणभर काम अन हातभार प्रसिद्धी असे गेल्या तीन-चार महिन्यापासून जो- तो उठसूट कोरोना योध्दाच झाला आहे,खऱ्या कामाची पावती प्रमाणपत्रवरून नव्हे तर कर्तव्यप्राप्ती जागरूक असलेल्या तत्परतेने मिळते असे महाराष्ट्र पारधी विकास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अर्जुन काळे ह्यांनी ठोस प्रहार प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.मात्र भान हरपलेल्या सामाजिक संस्थानी बेकायदा कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटपाचा सुळसुळाट चालू केला आहे असे स्पष्ट केले आहे.
ते पुढे म्हनाले की,प्रमाणपत्राचे वाटप हे कायदेशीर नाही.सामाजिक संस्था मूळ उद्देशाला हरताळ फासत आहे.प्रशिस्तपत्र वाटप करणे गैर नाही पण त्याचा फार इव्हेंट झाला आहे.अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण व आरोग्य या सारख्या गरज नागरिकांना पुरवण्यासाठी धर्मदाय संस्था सामाजिक संस्थाना परवानगी देते.मात्र या सामाजिक संस्था सत्कार,सोहळे यासारख्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत आहे,प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम कोणत्याही चौकटीत न बसता तो शून्य आहे असे महाराष्ट्र पारधी विकास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अर्जुन काळे ह्यांनी स्पष्ट केले आहे.






