प्रभागातील हातपंप दुरुस्ती न झाल्यास दुरुस्तीसाठी भिकमांगो आंदोलनाचा इशारा
उदय वायकोळे चांदवड
चांदवड शहरास पाण्याची समस्या काही नवीन नाही.काही नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलनही केले मात्र ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाही किंवा बोअरवेल नाही त्यांना हातपंपावरून पाणी भरावे लागते.चांदवड शहरातील प्रभाग क्र 6 मधील सहा हातपंप बंद अवस्थेत असून वारंवार तक्रार करूनही हातपंप दुरुस्त होत नसल्याची तक्रार माजी नगरसेविका सौ कविता उगले यांनी महिला, नागरिकांसह मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.येत्या दोन दिवसात हातपंप दुरुस्त न झाल्यास नागरिक व चांदवड शहर शिवसेनेच्या वतीने भिकमांगो आंदोलन करून दुरुस्तीचा खर्च जमा करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिलेला आहे.






