Amalner

वारी चालली शेगावला….

वारी चालली शेगावला….

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील मुंदडानगर समोरील संत गजानन महाराज संस्थानची आज गजानन भक्तांची पायीवारी शेगांवला रवाना झाली.
अगोदर सकाळी संत गजानन महाराज मंदीरात सकाळी पाच वाजता महाआरती झाली. अशोक भावे,नितीन भावे,रघूनाथ पाटील ,ज्योती पवार व गजानन भक्त महीला व पुरूष यांनी गजानन महाराज यांच्या वारीची तयारी
करत गजानन पादूकापूजन केले.
नंतर संत गजानन महाराज मंदीरापासून शिस्तबद्ध पद्धतीने वाजतगाजत पायी वारी निघाली.रस्त्यावर दोन्ही बाजूंना महीला वर्गाने रांगोळी काढून वातावरण भक्तीमय झाले होते.संत गजानन महाराज यांच्या गाण्यावर महीला व पुरुष नाचत आपला आनंद व्यक्त केला.
आज दिनांक 9 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत पायीवारीचे आयोजन आहे. पाच दिवसात पायीवारीतील गजानन भक्तांना सकाळचा नाश्ता,दुपारचे जेवन,चहा,रात्रीचे जेवन व मुक्कामाची व्यवस्था,पाण्याची व्यवस्था, औषध पुरवठा दानशूर गजानन भक्तांनी केली आहे.
या पायी वारीचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष आर बी पवार सर व त्यांच्या वारी प्रमुख यांनी आयोजन केले आहे.यावेळी शेगांव वारीत
मारवड,करणखेडा,सात्री
खापरखेडा,तामसवाडी
सबगव्हाण,कळमसरे
सुमटाणे,कावप्रिपी,इंद्राप्रिपी
अमळगांव व इतर गावातील गजानन भक्तांनी पायीवारीत समावेश आहे.यावेळी पायीवारीचे स्वागत मुंदडानगर, विदयाविहार काँलनी, सुरबी काँलनी, पटवारी काँलनी येथील गजानन भक्तांनी जोरदार वारीचे स्वागत केले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button