विवरा – उटखेडा लोहारा ते कुसूंबा रस्ता झाडं झुडपांच्या विळख्यात..अपघातांचे प्रमाणही प्रचंड वाढ
रावेर प्रतिनिधी/ मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील विवरा ते उटखेडा तसेच लोहारा ते कुसूंबा या ३+३ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर साईड पट्ट्यावर मोठमोठे काटेरी झुडपे सुबाभूळसह अन्य ईतर झाडेझुडपे ५’ते ७ फुट उंचीईतके वाढलेली आहेत तसेच काही झाडे खुप मोठी वाढल्यामुळे फांद्यांचा जणू पिसाराच रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहेत त्यातच रस्त्यालगत असलेल्या केळी बागांचीही भर पडत याच रस्त्यांवरील झाडाझुडपामुळे असंख्य प्रमाणात अपघातांची वाढ झाली आहे आणि अनेक वाहनधारकांना आपला जीवही गमवावा लागला असून त्यांचे मुलंबाळं संसार उघड्यावर पडलेली आहे तरी रावेर सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यासमोर पट्टी बांधली असल्याचे चित्र दिसतेय? या हद्दीतील संबंधित सावदा रावेर सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर तालुक्यातील अंकलेश्वर -बुर्हानपुर महामार्गावरील तसेच तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवरील कोरडी झालेली अर्ध कोरडी झालेली झाड सॉमिल लाकूड माफियांना परस्पर विक्री करण्यात पटाईत आहेत व विक्री वरकमाई केलेल्या झांडांची कापणी (कत्तल) मुद्दामहून सुट्टी म्हणजे शनिवार रविवार या दिवशी राजरोसपणे केली जाते? पण रावेर सावदा सा.बा विभाग मात्र या रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दुतर्फा कडेला असलेल्या काटेरी झाडेझुडपे या रावेर आणि सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का?? यांच काटेरी झाडेझुडपांमुळे अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे आणि अनेकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे कारण याच रस्त्यावर साईड पट्ट्यातील झाडं झुडपांच्या विळख्यात समोरुन येणारे वाहन कधी अंगावर येऊन धडकेल व कधी जीवन संपेल सांगता येत नाही याच धाकाने अनेक वाहनधारकांना रहदारी करतांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर व सावदा शाखा अभियंता यांनी जातीने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी ही रस्त्यावरील दुतर्फा कडेला असलेल्या काटेरी झाडेझुडपांची साफसफाई करावी अन्यथा याच रस्त्यावर जन आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही वाहनधारकांसह सुज्ञ नागरिक देत आहेत






