Maharashtra

विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 129 वी जयंती सर्वांनी महापुरुषांच्या चरित्र वाचनाने साजरी करावी-भीम आर्मी चे लक्ष्मण कांबळे यांचे आवाहन

विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 129 वी जयंती सर्वांनी महापुरुषांच्या चरित्र वाचनाने साजरी करावी-भीम आर्मी चे लक्ष्मण कांबळे यांचे आवाहन

लातुर प्रतिनिधी प्रशांत नेटके

विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 129 वी जयंती सर्वांनी स्वतःच्या घरातच बसून महापुरुषांच्या चरित्र आणि पुस्तके वाचून साजरी करावी
भीम आर्मीचे लातुर जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण कांबळे यांनी विंनती केली आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी कोरोना। विषाणू संसर्ग टाळण्यासाठी, देश हितासाठी
एकच संकल्प करूया…
घरात थांबून …आणि महापुरुषांच्या चरित्र पुस्तके वाचून
कोरोना व्हायरसचा नायनाट करूया अशी विनंती लक्ष्मण कांबळे यांनी केली आहे.

विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती आपण सर्वांनी स्वतःच्या परिवारासोबत आपल्या घरात च साजरी करावी ,कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी गर्दी करू नये.कोरोना संचारबंदीच्या नियमाचे पालन करावे .

आपल्या स्वतःच्या घरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन करून साध्या पद्धतीने घरात जयंती साजरी करावी. कारण जगात व भारत देशात कोविड-१९ अर्थात विषारी भयंकर कोरोना व्हायरस मुळे जागतिक व राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरस ने जगात हाहाकार माजवला आहे. इतर काही देश ह्या विषारी कोरोना व्हायरस पुढे हतबल झाले आहेत. आणि यामुळे देशात लॉक डाऊन केले आहे. घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. सर्व धार्मिक – सामाजिक कार्यक्रम घेण्यास बंदी घातली आहे. हे सर्व आपल्या हितासाठी व देशासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.
आपण सर्वजण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की, ज्या वेळी देश संकटात असेल त्यावेळी आपण देश हित लक्षात घेऊन कार्य केले पाहिजे. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहमीच सांगायचे मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय आहे.देशात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी विनंती केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button