India

Viral Fact: तो होणार आई..! जाणून घ्या सत्य..! निसर्ग तो निसर्गच..!

Viral Fact: तो होणार आई..! जाणून घ्या सत्य..! निसर्ग तो निसर्गच..!
केरळमधील ट्रान्सजेंडर कपल जिया आणि जाहाद यांनी सोशल मीडियावरून त्यांना बाळ होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाम्पत्याने इन्स्टा पोस्टवर काही फोटोही शेअर केले आहेत. कोझीकोडमधील वैद्यकीय कॉलेजच्या डॉक्टरांच्या एका पथकाने म्हटलं की, गर्भधारणा करण्यात दाम्पत्याला कोणत्याही शारिरीक अडचणी नव्हत्या. दोघांनीही लिंग परिवर्तन केलं होतं.

जाहद हा भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समेन असेल. सर्जरीवेळी जाहदचे दोन्ही स्तन काढून टाकण्यात आले. पण गर्भाशय आणि इतर काही अवयव तसेच ठेवले होते. त्यामुळे गर्भधारणेत यश आलं.जियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, मी जन्माने किंवा शरिराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं.जिया आणि जाहाद हे दोघेही गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहतात. जिया पुरुष म्हणून जन्मला होता, त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला झाला. तर जाहद एक महिला म्हणून जन्माला आली आणि लिंगबदलानंतर पुरुष बनली. बाळाच्या जन्मानंतर त्याला मिल्क बँकेतून दूध पाजलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय.

Viral Fact

भारतातला हा पहिला ‘ट्रान्स-मॅन’ आहे जो बाळा ला जन्म देणार आहे. अशी बातमी सर्व मेनस्ट्रीम मीडिया चालवत आहे.

जाहद ज्याला मिडिया वाले ‘ट्रान्स-मॅन’ म्हणताय, जो प्रेग्नंट आहे तो जन्मतःच ‘स्त्री’ आहे. प्रेग्नेंट होण्यासाठीचा गर्भ, योनी, अंडाशय, फेलोपियन tubes, फिमेल हॉर्मोन्स.. तिच्यात जन्मताच आहेत. म्हणून निसर्ग नियमानुसार ती बाईच आहे. तिने पुरुषा सारखं दिसावं म्हणून तिने स्तनांची सर्जरी करून ते काढून टाकले आहेत. केस कमी केले आहेत.

राहिला प्रश्न बाळाच्या बापाचा?? तर जिया जिला ‘ट्रान्स वूमन’ म्हंटल जातंय तो जन्मताच पुरुष आहे. बाई ला प्रेग्नंट करण्यासाठी चे पेनिस, स्पर्म्स, अंडकोश आणि मेल हॉर्मोन्स जिया कडे जन्मताच आहेत. त्याने बाई सारखं दिसण्यासाठी तसा साज केला आहे.

तर प्रेग्नंट असणारी ही बाईच आहे आणि प्रेग्नंट करणारा ही पुरुषच आहे.

माणसाने किती ही प्रगती केली कल्पना केल्या तरी त्या कल्पना निसर्गापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत.

#निसर्ग_श्रेष्ठ_आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button