Nashik

दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे विविध उपक्रम प्रेरणादायी – डॉ संदीप आहेर

दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे विविध उपक्रम प्रेरणादायी – डॉ संदीप आहेर

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : पत्रकार हे लोकशाहीचे आधारस्तंभ असून आपल्या राज्य पुरस्कार प्राप्त दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असून त्यांचे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ संदीप आहेर यांनी केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस ६जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गुणवंत पाल्य सत्कार व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ आहेर बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैधकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, श्रीम.संघमित्रा बाविस्कर,श्रीम दर्शना सूर्यवंशी पाटील , पत्रकार संघाचे पाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांनी केले.
दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रांत अधिकारी डॉ संदीप आहेर, उत्कृष्ट प्रशासक म्हणून तहसीलदार पंकज पवार, कोविड काळातील उत्कृष्ट नियोजन कामकाज केल्याबद्दल तालुका वैधकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुच्छ देत सत्कार करण्यात आला.नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, श्रीम संघमित्रा बाविस्कर, श्रीम दर्शना पाटील यांनीही उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन्मानपत्र ब भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आले.
गुणवंत पत्रकार पाल्य कु अदिती संदीप मोगल, कु शुभांगी अशोक निकम, कुमार कपिल शांताराम पगार यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,गुच्छ देत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावेळी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस भगवान गायकवाड , जेष्ठ पत्रकार नितीन गांगुर्डे, समाधान पाटील यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व उपाध्यक्ष सुखदेव खुर्दळ यांची प्रहार च्या जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनांच्या शुभेच्छा दिल्या.पत्रकार संघाचे सरचिटणीस भगवान गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार ,सरचिटणीस भगवान गायकवाड, महेश ठुबे, संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, अशोक केंग, रमाकांत शार्दूल, केशव चित्ते,आदी पदाधिकारी सह जेष्ठ पत्रकार नितीन गांगुर्डे, विलास ढाकणे, अशोक निकम, सुनिल घुमरे, दिगंबर पाटोळे, बाळासाहेब अस्वले, किशोर देशमुख, राजेंद्र जाधव, विलास जमदाडे, समाधान पाटील, श्रीराम देवकर, अरुण बैरागी, योगेश मेधने, नामदेव पैठणे, बंडू खंडागळे, खंडेराव बोराडे, विनोद गायकवाड, खंडेराव डोखळे, संतोष चारोस्कर, निलेश मौले, सागर मोर, किरण पैठणे, किशोर क्षीरसागर आदीसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचा तहसील कार्यालयाच्या वतीने डायरी ,पेन व पुष्प देत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जमदाडे यांनी तर आभार तुषार वाघ यांनी मानले. फोटो- दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर यांचा सन्मान करतांना पत्रकार संघाचे पदाधिकारी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button