Amalner

सुंदरपट्टी येथे लसीकरण कँप संपन्न…

सुंदरपट्टी येथे लसीकरण कँप संपन्न…

आज दिनांक 14 /8/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकु उपकेंद्र सडावण यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गाव सुंदरपट्टी तालुका अमळनेर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुंदरपट्टी येथे covid-19 लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला सदरचा लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुंदरपट्टी आदर्श गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री सुरेश अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या लसीकरणाच्या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ श्री कमलेश भावसार,सौ कल्पना गायकवाड, श्री आर एन निकुम, श्री.के एच पाटील, श्रीमती पि टी दुधे, श्री अनिल सोनवणे, श्री ए आर पाटील सौ शितल सोनवणे श्रीमती एल एच पाटील हे सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी माहिती अधिकारी ट्रेनर सुनील अहिरराव अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पि के पाटील मॅडम, मुख्याध्यापक श्री जगताप, श्री विश्वास पाटील, श्रीमती स्मिता सोनवणे, ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य देविदास गंगाराम पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुनिता प्रकाश पाटील व ग्रामपंचायत सदस्य सुरेखा सुरेश पाटील अंगणवाडी सेविका मदतनीस व जिल्हा परिषद मदतनीस सर्व ग्रामस्थ तसेच लाभार्थी महिला भगिनी व गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ व महिला मंडळ तरुण मित्र मंडळ जिल्हा परिषद शाळा सुंदरपट्टी येथे उपस्थित होते आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कोरूना चे नियम पाळून ग्रामस्थांना यशस्वीरीत्या लसीकरण केले सदरच्या लसीकरणा मध्ये प्रथम दोष व द्वितीय डोस देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच श्री सुरेश अर्जुन पाटील यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Back to top button