Maharashtra

नागरिकांनो लॉक डाऊन चे काटेकोरपणे पालन करा मास्क”वापर करा

नागरिकांनो लॉक डाऊन चे काटेकोरपणे पालन करा मास्क”वापर करा व कोरोनाला हद्द पार करा- कालु मिस्तरी ग्रा.प.सदस्य/माजी सरपंच यांनी केले नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी मुबारक तडवी

दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भावामुळे लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत जोमाने वाढ होताना दिसत आहे याला वेळीच आळा घालणं जरुरीचे झाले आहे
आणखी दोन आठवडे घरातच बसा स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा
नागरिकांनो.अभी नही तो कभी नही आता ऐकले नाही.तर तुम्ही स्वतःलाही माफ करू शकणार नाही.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येणारे ३० एप्रील पर्यंतचे दिवस भविष्या साठी अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा गेल्या २१ दिवसाच्या लॉक डाऊन वर पाणी फिरू शकते. म्हणून वाढलेल्या आणखी दोन आठवडे लॉक डाऊनचे काटेकोर पालन करा घराबाहेर पडणे,जनसंपर्क गर्दी,लग्न,धार्मीक समारंभ,टाळा. व सामाजिक दुरीचे पालन करा.
*तोंडाला रुमाल अथवा मास्क बांधा*.गावांमधील सामान्य जनतेला मेडीकल मधून अथवा इतरत्र दुकानांमधूम मास्क विकत घेणे शक्य होत नसेल, त्या नागरीकांनी घरात उपलब्ध स्कार्प, रुमालाचा मास्क म्हणून वापर करावा.सध्या तापमानात वाढ झाली आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने खान्देशातील केळी उत्पादक शेतकरी उन्हापासुन संरक्षण व्हावे. म्हणून *शेतकरी बागायतदार रुमालाचा डोक्याला बांधण्यासाठी वापर करतात.याच बागायतदार रुमालाचा कोरोनाच्या संसर्गापासुन बचाव होण्या साठी मास्क विकत न घेता मास्क म्हणून वापर करावा असे आवाहन मोठा वाघोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शेख चांद.शे.नबी.उर्फ कालु मिस्तरी यांनी मोठा वाघोदा येथील नागरीकांना केले आहे. या आवाहनाला तसेच कोरोना ला हलविण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरणासाठी वेडी फवारणीहीसह गावात साफसफाई करण्यात येत आहे तरी ग्रामस्थांनी कामाशिवाय घराबाहेर निघू नये व घरात राहूनच तोरणा या महाभयंकर रोगाला ठरविण्यासाठी शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button