Maharashtra

लाक डाउन काळात अनाधिकृत मिटींग घेणारे संचालक व शाळा कर्मचारी झाले पास

लाक डाउन काळात अनाधिकृत मिटींग घेणारे संचालक व शाळा कर्मचारी झाले पास

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा द्वारे संचलित अॅगलो उर्दू हायस्कूल चे कर्मचारी व निवडक संचालक यांनी सामुहिक रित्या अनाधिकृत मिटींग घेतल्या संदर्भात ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी युसूफ शाह यांनी “ठोस प्रहार चे भाकित ठरले खरे, संस्थाचालक व शाळा कर्मचारी यांचीतातडीची अनाधिकृत बैठक संपन्न , सोशल डिसटनसिंग चे वाजले बारा ” या मथळ्याखाली पुराव्यानिशी सविस्तर बातमी प्रकाशित केली होती.परंतु कारवाई चे दिशा चक्र फिरवण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाला अधिक वेळेची गरज भासल्याचे कळते.
सध्या कोरोना पासून स्वतः ला व लोकांना सुरक्षित राखायचे असेल तर सामाजिक शिस्त आणि सरकारने घालून दिलेले निर्बंध पाडणे हे प्रत्येक व्यकती ची जबाबदारी आहे. या भयंकर परिस्थितीत कोरोना योद्धे व प्रशासन आपल्या कुटुंबाला सोडून थेट जनतेच्या रक्षणासाठी चोवीस तास सेवा बजवित आहे याची जाणीव ठेवणे आपले कर्तव्य असुन याकडे जाणिव पुर्वक अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व निवडक संस्था चालक सारखे शिक्षित लोकांनी अनाधिकृत व उघड पणे सोशल डिसटनसिंग न ठेवता तोंडाला मासक न लावता मिटींग घेतातआणि राजरोस पणे नियमांचे उल्लंघन करून हजारो कोरोना योद्धांचासेवेचा व तयागाचा अपमान करणाय्रांवर कायदे चे विविध कलमा खाली थेट गुन्हा दाखल होणे गरजेचे नाही का? सदरील शिक्षक मंडळी व संचालक मंडळ यांनी लाक डाउन काळात उघड पणे मिटींग घेणे व्यैकतिक व सार्वजनिक आरोग्यास धोका दायक ठरणारे कार्य नाही का? तोंडाला मासक न लावणे तसेच बैठकित सोशल डिसटनसिंग न ठेवणे हे कायद्या चे उघड पणे उल्लंघन नाही का? या संकट काळात राष्ट्रीय कर्तव्य विसरून सामुहिक रित्या जमा होऊन त्याना मिटींग घेण्याची गरज का भासली? सदरील मिटींग घेण्या करीता कोणत्या संबंधित सक्षम अधिकार्यांच्या परवानगी घेतली होती का? हा तपासा चा भाग नाही का?
असे असतांना ही आज पावेतो त्याचे वर कायदेशीर कारवाई न होण्या मागे काही गोड बंगाल लपले आहे का?
सदरील प्रकार हा गंभीर व दखल पात्र असून ही कारवाई का करण्यात आली नाही? ठोस प्रहार ने पुराव्यानिशी प्रसिद्ध केलेली बातमी स अर्थ नाही का? की संबंधित अधिकारी कडुन ध्रुतराष्टृ सारखी कुचकामी भुमिका कारणीभूत आहे. या बाबत वाचकांना व जाणकारांना यक्ष प्रश्न पडलेला आहे.
अधिकाय्रांची भुमिका
सदरील प्रकरणा संबंधात ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी यांनी या बातमी चे पाठपुरावा करणे संबंधि सावदा पोलिस स्टेशनचे ए.पी. आय. यांना भेटून पुराव्यानिशी प्रसिद्ध झालेल्या बातमी बद्दल केलेला पाठपुरावा व कारवाई बाबत विचारले असता , महसूल प्रशासन (मुख्य अधिकारी , सर्कल , तलाठी – सावदा) हे गुन्हा नोंद करणे बाबत सांगतील तेव्हा आम्ही कारवाई करु. असे उत्तर मिळाले.

या नंतर सावदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दूरध्वनी वरुन विचारले असता…..
बातमी वहाटसप वर वाचली आहे. *बघतो*

प्रांत अधिकारी फैजपूर यांचे शी संपर्क न झाल्याने त्यांना वहाटसप वर मॅसेज करून कल्पना देण्यातआली असता त्यांचे कडून आज पावेतो उलट टपाली जबाब मिळालेला नाही.

अशा प्रकारे अनाधिकृत व उघड पणे मिटींग घेणाय्रांवर पुरावे असतांना ही दोषींवर कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाही……..
प्रशासनाची दुटप्पी भूमिका बघून लोकां मध्ये असंतोष पसरलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button