Rawer

दरड कोसळून दोन जण ठार तर दोन जण जखमी…

दरड कोसळून दोन जण ठार तर दोन जण जखमी…

रावेर विलास ताठे

आज तालुक्यातील निंभोरासिम येथे दरड कोसळुन दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्का दायक घटना आज सकाळी येथे घडली. तसेच या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दीपक सवर्णे (वय-२०) आणि सुशांत मराठे (वय-२२ रा. नायगाव) असे मृत तरुणांची नावे आहेत. तर समाधान मरु कोळी (वय-20 रा. नायगाव) हे गंभीर जखमी झाले आहे.

निंभोरासिम विटवा रस्त्यावरील गट नंबर 46वरील शासकीय बरर्डीवर येथे बक-या चारण्यासाठी गेले असतांना अचानक वरुन दरड कोसळली. यात दीपक सवर्णे व सुषानंद पाटील हे दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे तर समाधान कोळी हा गंभीर जखमी झाला असून त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तींचा कुटुंबांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी गावकऱ्यांची देखील प्रचंड गर्दी केली होती.परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button