राजे संभाजी मित्र मंडळ व शिवशक्ती मित्र परिवारातर्फे तिरंगा रॅली चे स्वागत
अमळनेर येथील राजे संभाजी मित्र परिवार व शिवशक्ती मित्र परिवाराचा वतीने 1 किलोमीटर तिरंगा चे दगडी दरवाजा(राजे संभाजी चौक)येथे स्वागत करण्यात आले.यावेळी महिला भगिनी ची उपस्थिती लक्षणीय होती. पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले.
आज अमळनेर शहरातून एक किमी तिरंगा झेंडा घेऊन रॅली काढण्यात आली. ह्या रॅलीत अमळनेर शहरातील सर्व शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी,प्रशासकीय,राजकीय,शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनेक ठिकाणी रॅली चे जोरदार स्वागत करण्यात आले. राजे संभाजी मित्र परिवार व शिवशक्ती मित्र परिवार तर्फे देखील रॅलीचे स्वागत करण्यात आले.






