Faijpur

फैजपूर येथे पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

फैजपूर येथे पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

सलीम पिंजारी

प्रतिनिधी फैजपूर: गेल्या वर्षी जम्मु कश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील शहिदांना आज स्मृतीदिनानिमित्त फैजपूर येथील महाराष्ट्र मित्र मंडळ मोठी पाण्याची टाकी परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतमोतेचे पुजन करण्यात आले,त्यानंतर दिवे पेटवून व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.श्री.अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर,सौ.महानंदा होले नगराध्यक्षा,श्री.निलेश राणे माजी नगराध्यक्ष, श्री.जे.डी.बंगाळे मंडळ अधिकारी,सौ.दिपाली चौधरी झोपे खान्देश नारीशक्ती अध्यक्षा, डॉ.भरत महाजन, श्री.संदिपभाऊ पाटील मानवाधिकार जिल्हाध्यक्ष,श्री.देवेंद्र झोपे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच महिला व तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सुत्रसंचालन श्री.गणेश गुरव सर मुख्याध्यापक यांनी केले.यशस्वीतेसाठी निरज झोपे, लोकेश कोल्हे,भरत कोल्हे,शाम चौधरी, निखील चौधरी यांच्यासह सर्व महाराष्ट्र मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button