अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सावदा मंडळ अधिकारी यांनी केले जप्त
युसूफ शाह सावदा
सावदा : कायद्याला न जुमानता अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यां सरकारी वेळ चुकवुन रात्री-बेरात्री सकाळी पहाटे सर्रासपणे वाळूची जास्त भावांनी वाहनाद्वारे विक्री करणारे माफिया एजंट यांचा उद्रुकच झालेला आहे याकडे लक्ष देऊन गुप्त माहितीच्या आधारे आज दिनांक ११ जून २०२१ रोजी सकाळी साडेसात वाजता अवैधरित्या वाळू भरून नेणाऱ्या एका ट्रॅक्टरला सावदा मंडळ अधिकारी सह पथकाने जप्त करून कारवाई केलेली आहे
यावेळी रावेर चे पथक प्रमुख डी, एम पवार, मंडळ अधिकारी सावदा, एम एस तडवी तलाठी थोरगव्हाण, श्री हरी कांबळे तलाठी रायपुर, ओ एस मटाले तलाठी मस्कावद, मोमीन तलाठी उधळी, रुपेश चोपडे तलाठी गाते, यांनी मिळून कोथळी बुद्रुक येथे संजय भास्कर धनराज राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर यांचे मालकीचे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर नं. एम एच १९ ए एन ४६५४ हे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहून नेत असताना पकडले
सदरील अवैध वाळू भरलेल्या ट्रॅक्टर चा पंचनामा सावदा मंडळ पथकाने करून पोलीस स्टेशन येथे जमा केले सदरील कारवाई उपविभागीय अधिकारी तहसीलदार मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केली. सावदा व परिसरात आजूबाजूच्या खेड्यापाड्यांवर मोठ्या प्रमाणात दिवसाची सरकारी वेळ चुकवुन रात्री बे रात्री सकाळी पहाटेच्या दरम्यान ट्रॅक्टर, डंपर, गाड्या, विनापरवाना अवैधरित्या वाळू वाहत असतात त्यांच्यावर सुद्धा लक्ष देऊन कारवाई होणे गरजेचे आहे






