Delhi

?आताची मोठी बातमी..खाजगिकरणाच्या निशाण्यावर “ह्या” 4 बँका..! ह्या बँकांच्या खासगीकरणाची तयारी ?

?आताची मोठी बातमी..खाजगिकरणाच्या निशाण्यावर “ह्या” 4 बँका..! ह्या बँकांच्या खासगीकरणाची तयारी ?

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच आणखी 4 बँकांचं खासगीकरण करू शकते. लाइवमिंटच्या बातमीनुसार सरकारने खाजगीकरणाच्या पुढील टप्प्यात 4 मीड साइज राज्य संचालित बँकांची निवड केली आहे. ज्यांचं खासगीकरण लवकरच केलं जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लिस्टमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया इंडियन ओवरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या नावांचा समावेश आहे.

काय आहे सरकारचा प्लान

सरकारी बँका विकून सरकारला महसूल मिळवायचा आहे. ज्यामुळे हे पैसे सरकारी योजनांसाठी वापरता येतील.
सरकार सध्या खासगीकरण मोठ्या प्रमाणात करण्याची योजना आखत आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात सरकारचा मोठा वाटा आहे, ज्यामध्ये हजारो कर्मचारी काम करतात. तसं पाहता बँकांचे खासगीकरण ही एक धोकादायक काम आहे, यामुळे काम करणाऱ्या कर्मचार्‍यांवरही याचा परिणाम होऊ शकतो.

बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आपल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 च्या भाषणात याबाबत घोषणा केली होती. केंद्र सरकार यावेळी निर्गुंतवणुकीवर अधिक भर देत असल्याने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण करण्यात येईल. त्याद्वारे भारत पेट्रोलियममधील निर्गुंतवणुकीचे नियोजन केले जात आहे.

केवळ 5 सरकारी बँका शिल्लक राहतील

यावेळी केंद्र सरकार देशातील निम्म्याहून अधिक पीएसयू बँकांचे खाजगीकरण करण्याचा विचार करीत आहे. तर सर्व काही योजनेनुसार राहिले तर, आगामी काळात देशात फक्त सरकारी बँका राहतील. गेल्या तीन वर्षांत बँकिंग क्षेत्रात विलीनीकरण व खासगीकरणांमुळे राज्य सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली असून, ती आता मर्यादित करण्याचे ठरवित आहे. यासाठी नितीयोग यांनी ब्ल्यू प्रिंटही तयार केले आहे.

सध्याच्या सरकारी बँका
भारतीय स्टेट बँक (SBI)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
यूको बँक
पंजाब एंड सिंध बँक
इंडियन ओवरसीज बँक
बँकऑफ बड़ौदा देना बँक विजया बँक
पंजाब नेशनल बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यूनाइटेड बँक
केनरा बँक सिंडिकेट बँक
यूनियन बँक ऑफ इंडिया आंध्रा बँक कॉरपोरेशन बँक
इलाहाबाद बँक इंडियन बँक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button