?आताची मोठी बातमी…राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध…!शिवभोजन थाळी मोफत..रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
● राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144 लागू होणार.
● सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
● रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार
● लोकल ट्रेन आणि बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठी फक्त सुरू राहणार.
● पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल.
● हवाई मार्गे ऑक्सिजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील जनतेशी सवांद साधत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादातून मोठी घोषणा केली आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात रात्री ८ पासून कलम १४४ लागू करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये संचार बंदी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. या कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची रोजी मंदावणार आहे परंतु त्यांची रोटी मी थांबू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिलेला आहे.
राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, १ किलो तांदूळ १ महिन्यासाठी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. तसेच नोंद केलेले लाभार्थी ७ कोटी आहेत. या सर्वांना १ महिना ३ किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत देणार आहे. तसेच शिवभोजन थाळी १० रुपयात यापूर्वी मिळत होती. ही योजना कोरोना काळात ५ रुपयात केली होती. परंतु आता हि शिवभोजन थाळी गोरगरिबांना मोफत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दिलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
– करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध अधिक कठोर
– उद्या सायंकाळी आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार
– राज्यात १४४ कलम लागू होणार. पुढील किमान पंधरा दिवस संचारबंदी
– अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
– अत्यावश्यक सेवा व उपक्रम वगळून उर्वरित सर्व सेवा बंद राहणार.
– सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.
– सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार.
– रुग्णालये व संबंधित सेवा, शीतगृहे, वेअर हाऊसिंग, बँका व सेबीशी संबंधित सेवा, दूर संचार सेवा, ई-कॉमर्स, पेट्रोल पंप सुरू राहणार
– हॉटेलमध्ये टेक अवे सुरू राहणार
– अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देणार. सात कोटी नागरिकांना मोफत धान्य
– महिनाभर गोरगरिबांना मोफत शिवभोजन देणार.
– निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये अर्थसाह्य आगाऊ देण्यात येणार.
– नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपये अर्थसाह्य. बारा लाख कामगार.
– नोंदणीकृत घरकामगारांना निधी देण्यात येणार.
– अधिकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देणार. त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.
– परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात येणार.
– आदिवासी कुटुबांना दोन हजार रुपये अर्थसाह्य






