Mumbai

?आताची मोठी बातमी…आयपीएस अधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..! पहा काय दिले पुरावे..!किती मागितली जात होती खडणी…!

?आताची मोठी बातमी…आयपीएस अधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..! पहा काय दिले पुरावे..!किती मागितली जात होती खडणी…!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खळबळ उडवून दिली आहे. या पत्रातून परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला आहे.

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनीच असे गंभीर आरोप केल्यानंतर भाजपनेही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आता हे स्पष्ट झालं आहे की हे सरकार भ्रष्ट आहे,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button