Maharashtra

मुंबईत यंदाची १५ वर्षांतील सर्वांत शांत दिवाळी

मुंबईत यंदाची १५ वर्षांतील सर्वांत शांत दिवाळी

अनिल पाटील

मुंबई: सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दणक्यात साजरी होत आहे. मात्र, यंदा कानठळ्या बसविणारे न फुटल्याने मुंबईत गेल्या १५ वर्षातील सर्वात शांत दिवाळी साजरी झाली आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधातील मोहिमेमुळेच यंदा मुंबईत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे फटाके फुटले नसल्याचं सांगण्यात येतं. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जागृती सुरू आहे. त्याला यंदा चांगलं यश मिळालं आहे.

यंदा दिवाळीत ध्वनी प्रदूषणाची ११२.३ डेसिबल इतकी नोंद झाली आहे. रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानेही त्यावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येतं. त्या आधी २०१७च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची ११७.८ डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती, असं आवाज फाउंडेशनने म्हटलं आहे. दिवाळीत कमी डेसिबलची नोंद होणं याचा अर्थ लोकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागृती निर्माण होत आहे. त्याशिवाय लोक आता दिवाळी दणक्यात साजरी करताना फटाक्यांचा वापरही कमी करत असल्याचं दिसून आलं आहे, असं आवाजचे सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितलं. गेल्या १५ वर्षांपासून ‘आवाज’ फाऊंडेशन दिवाळीतील प्रदूषणाची नोंद ठेवत आहे. तेव्हापासून आतापर्यंतचा अनुभव पाहता यंदाची दिवाळी अत्यंत शांत आहे, असंच म्हणावे लागेल.

२०१० पर्यंत दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे आवाज असायचे. या फटाक्यांचा आवाज कधी कधी तर १४५ डेसिबलपर्यंत जायचा, असं सुमैरा म्हणाल्या. यंदा आवाजाची पातळी ११२.३ डेसिबल इतकी आहे. सुतळी बॉम्ब सारख्या कानठळ्या बसविणारे फटाके यंदा कमी झाले आहे. यंदा फुलबाजा, सुरसुरी, चक्रीचाच दिवाळीत वापर करण्यात आला. त्याबद्दल मी मुंबईकरांना खास धन्यवाद देते. माझ्यासाठी तर ही हॅपी दिवाळीच आहे, म्हणूनच मला मुंबईकरांना पुन्हा एकदा धन्यवाद द्यावेसे वाटतात, असंही त्यांनी सांगितलं. यंदा मुंबईत मरीन ड्राइव्ह जिमखाना आणि दक्षिण मुंबईत फटाक्यांचा सर्वाधिक आवाज होता. मुंबईत रात्री १०.४५ वाजेपर्यंत फटाके फोडल्या गेले. मात्र सव्वा दहा वाजेपर्यंत त्यांचं प्रमाण कमी होतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button