Maharashtra

आलेगांव येथे चोरांचा धुमाकूळ

आलेगांव येथे चोरांचा धुमाकूळ

प्रतिनिधी विलास धोंगडे

नगद दीड लाख आणि दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा एवज लंपास.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी साळुंखे यांची भेट
गावकर्यानी चोरांचा केला पाठलाग, चोर पळून जाण्यात ठरले यशस्वी.

आलेगांव दि.९ प्रतिनिधी आलेगांव परिसरामध्ये गेल्या काही दिवसां पासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून दि.९ गुरुवार रोजी रात्री १-३० वाजताच्या सुमारास सागर पदमने रा आलेगांव झोपडपट्टी भाग यांच्या राहत्या घराचे दार उघडून गोदरेज कपाटातील नगद १ लाख ५० हजार रुपये व सोन्याचे दागिने किंमत ६० हजार एकुन दोन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पसार करण्याची घटना घडली.

चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेगांव येथील सागर पदमने यांचे घर शेताला लागून असल्याने चोरांनी शेता कडून असलेल्या घराचे दार उघडून गोदरेज कपाटातील प्लॉट खरेदीसाठी आणून ठवलेले नगद रुपये दीड लाख रुपये व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने एकून दोन लाख रुपयांचा ऐवज दि.९ गुरुवार रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.सदर घटनेपूर्वी अथवा आधी माळीपुर्यातील शेताला लागून असलेल्या घरांमध्ये त्याच रात्री १-२० वाजता सुमारास दिनकर निखाडे यांच्या घराचे दार उघण्याचा चोर चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना शेजारीच असलेले दिवाकर यांना आढळून आल्याने त्यांनी तेवढ्याच रात्री ग्रा.पं.सद्स्य विजय बोचरे,यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला विजय बोचरे यांनी हर्षल ढोणे,सचिन बोचरे,दीपक बोचरे,दिवाकर गिर्हे, अमोल गिर्हे, दिलीप गिर्हे व इतर युवकांना व पोलिसाना सोबत घेऊन चोरांचा पाठलाग केला.परंतु चोरट्यांनी शेतातील अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.तदनंतर पोलीस पाटील देवनाथ धाईत पोलीस चौकीचे जमादार इंगळे,व पोलीस कर्मचारी दादाराव आढाव आदींनी गावा बाहेर जाण्याचे रस्ते ब्लॉक करून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
**********************
घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ञ यांची उपस्थिती.
*********************
चोरीचा छडा लाण्यासाठी घटनास्थळा वर सकाळी १० वा दरम्यान ठसे तज्ञ पथकाने ठसे घेतले.तसेच श्वान पथकाने चोराच्या पायातील शेतात फसलेल्या बुटाचा smel देऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.शेतजमीन जमीन पावसामुळे ओली असल्याने श्वान पथकाला मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने चोरांचा शोध लागू शकला नाही.

घटनास्थळाला पोलीस उपवीभागिय अधिकार्याणी दिली भेट
**********************
घटनास्थळी बाळापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन चोरट्यानी पलायन केलेल्या रस्त्याची पाहणी करून श्वान पथकाला पाचारण करून चोरट्याचा माग करण्याचे सांगितले.या वेळी चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे,जमादार इंगळे,आढाव यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button