?️ हे आहेत बॉलिवूड मधील मुस्लिम कलाकार जे नाव बदलवून झाले प्रसिद्ध….ह्यांची नावे ऐकून कोणीही होईल आश्चर्यचकीत….
प्रा जयश्री दाभाडे
बॉलिवूड हे असं रसायन आहे की जेथे खोटे,खरे आणि सर्वच प्रकारचे अभिनेते अभिनेत्री नशीब आणि मेहनतीच्या जोरावर आपलं भाग्य उजळवून टाकतात.बॉलिवूड अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या एका अत्यन्त मोठ्या इंडस्ट्री मध्ये रोज अनेक किस्से घडत असतात.इथे शेकडो लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात.यातील काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी.. पण इथे कोणीही उपाशी मरत नाही….चित्रपट सृष्टी बद्दल अनेक अफवा रोजच पासरविल्या जातात.इथे अनेक मान्यता आहेत यातील एक म्हणजे नाव बदलून कामास सुरुवात केली तर यश मिळते.आणि हे बऱ्याच अंशी खरेही आहे.
आपलं खर नाव जन्म नाव सोडून दुसऱ्या नावाने अनेक नामवंत कलाकार या सृष्टीत यशस्वी झाले आहेत.यात काही मुस्लिम कलाकार हिंदू नावाने प्रसिद्ध झालेले आपणांस पाहवयास मिळतात.
बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत जे मुस्लिम असूनही हिंदु नावाने प्रसिद्ध झाले आहेत. चला तर मग आज अशाच ५ कलाकारांबद्दल जाणून घेऊ या…
- दिलीप कुमार –
दिलीप कुमार हे बॉलिवूडचे प्रथम सुपरस्टार होय. 60 च्या दशकात चित्रपटांमध्ये दिलीप कुमार ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या यांचे खरे नाव मोहम्मद यूसुफ खान असे होते.पण चित्रपट सृष्टीत दिलीप कुमारच्या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवार होते, जे एका मुस्लिम कुटुंबातून आले होते. दिलीप कुमार यांचा निकाह अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी झाला आहे.
-
रीना रॉय –
रीना रॉय ही 70 च्या दशकातील नामांकित अभिनेत्री होती.खूप कमी लोकांना हे माहीत असेल की रीना रॉय एका मुस्लिम कुटुंबातून आली आहे आणि तिचे खरे नाव सायरा अली असे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी आणि प्रसिद्धी साठी आपले नाव बदलून सायरा वरुन रीना रॉय असे ठेवले.
-
निम्मी –
बॉलिवूडमधील 50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये निम्मीचे नाव समाविष्ट आहे. १९४९ च्या सुपरहिट फिल्म ‘बरसात’ ने त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आपल्या अदाकारी आणि अभिनयाने निम्मी ने प्रेक्षकांची मने जिंकली होती.बॉलिवूडमध्ये निम्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे खरे जन्म नाव नवाब बानो होते आणि त्यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता.
-
जगदिप –
जगदीप हे हिंदी चित्रपट सृष्टी तील एक क्लासिक कॉमेडियन होते. ते आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. जगदीप हे देखील मुस्लिम कुटुंबातील होते आणि त्यांचे खरे नाव इस्तियाक अहमद जाफरी असे होते.त्यांचा मुलगा जावेद जाफरी हे उत्कृष्ट नृत्य कलाकार आणि कॉमेडियन आहेत.
जगदीप यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्यांच्या ‘शोले’ आणि ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटांमधील अभिनय अविस्मरणीय आहे.
-
अर्जुन – ९० च्या दशकात अर्जुन एक सुप्रसिद्ध कलाकार होता. जिगर, मेहंदी, करण अर्जुन अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे. फिरोज खान हे त्यांचे मूळ नाव आहे अर्जुन ह्या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला आहे. बीआर चोप्राच्या प्रसिद्ध पौराणिक शो ‘महाभारत’ मध्ये अर्जुनची भूमिका साकारणारा हाच तो कलाकार होता.








