Nashik

नाशिक येथे ईदच्या नमाजाला ईदगाह मैदानांवर परवानगी नाही

नाशिक येथे ईदच्या नमाजाला ईदगाह मैदानांवर परवानगी नाही

शांताराम दुनबळे

राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे . या दरम्यान , एकत्रित जमून कुठलाही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई आहे . केंद्र व राज्य सरकारचे धोरण स्पष्ट असल्याने रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी आपल्या घरातच अदा करावी , असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ . आरती सिंह यांनी केले आहे . पुढील आठवड्यात रमजान ईदचा सण साजरा होत आहे . काही मुस्लिम संघटनांनी ईदच्या सामूहिक नमाज पठणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे . या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मुस्लिम धर्मगुरू व ईदगाह ट्रस्टीची बैठक घेतली . बैठकीत आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल , मौलाना हमीद अब्दुल अझहरी , युसूफ इलियास यांनी परवानगी देण्याची मागणी केली . भावनांचा विचार करून सकाळी सात वाजेपर्यंत नमाज पठणासाठी वेळ देण्याची भूमिका मांडण्यात आली . पोलिस अधीक्षक डॉ . सिंह यांनी दारुल उलूम देवबंदच्या फतव्याची माहिती देत घरातचनमाज पठण करण्याच्या सूचना असल्याचे सांगितले . कामठी , भिवंडी व मुंब्रा येथेही अशी मागणी झालेली नाही . सर्वांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत सहकार्य करावे , अशी विनंतीही डॉ . सिंह यांनी केली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button