ट्रॅक्टर रिपेरी गॅरेजला अचानक लागली आग नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने आग आटोक्यात आणली अनर्थ टळला.
प्रतिनिधी संदीप अडसूळ
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड मजरेवाडी रोड दरम्यान असलेल्या शमशेर कुरणे यांचा ट्रॅक्टर रिपेरी गॅरेजला अचानक आग लागून हजारो रुपयाचे नुकसान झाले यावेळी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने आग आटोक्यात आणली पुढील अनर्थ टळला.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील सुमित्रा हॉस्पिटल समोर शमशेर कुरणे यांच्या मालकीची ट्रॅक्टर रिपेरिंग गॅरेज आहे या गॅरेजला आज सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागली आगीमध्ये गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले शेजारी असणाऱ्या लोकांनी शमशेर करणे यांना भ्रमणध्वनीवरून आग लागल्याचे सांगितले यावेळी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला भ्रमणध्वनीवर साधुन अग्निशमन विभागाचे नितीन संकपाळ, शरद गायकवाड, किशोर सांलुखे,फिलिप हेगडे, अनमोल पाटील, रमेश शेलारे, हेमंत सावंत, करन आलासे,यांनी अग्निशमन गाडीच्या साह्याने आग आटोक्यात आणली यावेळी या आगीत हाजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले यावेळी समशेर कुरणे,नजीर मखमल्ला, बाबासाहेब भबीरे, यांच्यासह पालिका कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
फोटो मेल केला आहे






