AmalnerMaharashtra

?️ Big Breaking..बंदचा अचानक निर्णय ?…सकाळी केंद्रीय समितीच्या समोर होणार फज्जा..!

बंदचा अचानक निर्णय ? …सकाळी केंद्रीय समितीच्या समोर होणार फज्जा..!

अमळनेर शहरात अकार्यक्षम प्रशासनाचा अनुभव आता पर्यंत सर्वांना च आला आहे. लॉक डावूनचे सर्व बंद चे निर्णय रात्री उशिरा घेतले जातात सामान्य जनतेपर्यंत बंद चा निर्णय पोहचत नाही परिणामी बंद चा फज्जा उडतो हे चित्र गेल्या 3 महिन्यांपासून पाहवयास मिळत आहे.

बंद रात्री उशिरा जाहीर करायचा सामान्य माणसाला निरोप द्यायचा नाही त्यांनी रस्त्यावर गाड्या लावल्या ,दुकाने उघडली की त्यांचे काटे फेकायचे,मुद्देमाल चे नुकसान करायचे,जबरदस्ती दंड करायचा (फक्त गरीब, छोट्या दुकानांच लागू आहे) आणि मन मनमानी कारभार चालवायचा असा काहीसा प्रकार शहरात गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे.

आजही रात्री 8 वाजता निर्णय घेण्यात आला आणि जनतेवर जबरदस्तीने बंद चा निर्णय लादला आहे.उद्या सकाळी केंद्रीय समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर तर आजचा निर्णय नाही ना ? पण याचा परिणाम काय होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. केंद्रीय समिती समोर फज्जा उडणार हे मात्र नक्की…

तुघलकी प्रशासनाचे तुघलकी निर्णय जनतेला महाग पडत आहेत.

परस्पर निर्णय घेणे,मनमानी कारभार चालवणे,स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, लोक प्रतिनीधी, पत्रकारांना विश्वासात न घेणे,इ चुकीच्या वागणुकीमुळे प्रशासन आणि जनतेत प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार, वशिलेबाजी, स्वयं केंद्रित पणा याचा फटका अमळनेर तालुक्यातील जनतेला बसत आहे. कोरोना मुक्ती कडे वाटचाल होणे अपेक्षित होते परंतु कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याला जबाबदार नियोजन शून्य,ढिसाळ प्रशासन असून जनतेत संतापाची तीव्र लाट आहे.प्रक्षोभ निर्माण झाला आहे. कारण अधिकार पदाचा वारंवार आपत्ती व्यवस्थापन काळात गैरफायदा घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन काळात जनतेत विश्वास,आपुलकी प्रशासनाबद्दल निर्माण होणे गरजेचे होते परंतु अमळनेर तालुक्यात मात्र विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य जनता मोठ्या प्रमाणात चिडली असून याचा उद्रेक होऊ शकतो अशी चर्चा जनतेत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button