नाशिक पेठ दोन राज्यांना जोडणारा रस्ता रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक पेठ रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्या असल्या कारणाने वारंवार अपघात घडत आहे पालक मंत्री भुजबळ साहेब, मा.खा.हरीचंद्र चव्हाण साहेब मा.झिरवाळ साहेब, मा.आ.धनराज महाले विधानसभा सदस्य असताना यांचं सर्वांचं सहकार्य घेऊन सदर रस्ता हा केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आला पालकमंत्री भुजबळ साहेब व मा.खा.चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आशेवडी म्हसोबा मंदिर शेजारी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कामच शुभारंभ करण्यात आला केल्या 12 वर्षा पासून रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे काही ठिकाणी काँक्रीटीकरण काही ठिकाणी टंबरीकरन करण्यात आलेल आहे त्या ठिकाणी फार मोठे खड्डे पडले आहे वारंवार अपघात होऊन अनेकांनी जीव गमावला आहे भाजीपाला नेआन व प्रवाशी यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे याची दखल प्रशासनाणे तात्काळ घ्यावी म्हणून समक्ष रस्त्याची पाहणी करण्यात आली याबाबत सोमवारी कार्यकारी अभियंता नाशिक आदरणीय पालक मंत्री भुजबळ साहेब यांची भेट घेऊन तात्काळ रास्ता दुरुस्त करण्यासाठी आदेश द्यावे ही विनंती शिष्ठ मंडळा सह करण्यात येणार आहे पुढील 8 दिवसात दुरूस्तीचे काम सुरू झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने सर्व शेतकरी बांधवाना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात येणार आहे यावेळी रस्त्याची पाहणी करतानी मा.आमदार धनराज महाले , नाना मोरे (उप ता.प्रमुख), देवेंद्रजी धाद्रक, पप्पू मोरे (शिवसेना विभाग प्रमुख) , जीवनजी मोरे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






