नवीन सभागृहाला कै. प्रभाकर बुला महाजन हे नाव द्यावे – नगरसेवक राजेश वानखेडे
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सावदा पालिकेच्या मालकीची जागेवर बांधण्यात आलेले नवीन सभागृहास ठरावानुसार कै. प्रभाकर बुला महाजन यांचे नाव लावण्यात यावे.अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दि.२० डिसेंबर २०२१ रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा कडे केली असून नुकतेच मान्यवरांच्या हस्ते या ग्रुप सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले मात्र सदरील नावाचे पारित केलेल्या ठरावाचा विसर पडल्याने त्यांनी असा पवित्रा घेतलेला आहे. तरी असे न झाल्यास दि.२२/१२/२०२१ रोजी सावदा पालिकेत होणारी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा गर्भित इशारा दिलेला आहे.यामुळे होणारी सर्वसाधारण सभेकडे शहरवासीयांची एकच लक्ष लागू आहे.






