Nashik

ब्राह्मणगाव येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न

ब्राह्मणगाव येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न

नाशिक – ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ,येथे नुकतीच ब्राह्मणगाव गटातील आरोग्य सेवेबाबत चर्चा व उपाययोजना करण्याबाबत “रुग्ण कल्याण समिती”ची बैठक सरपंच श्री.किरण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच श्री. बापुराज खरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
– या बैठकीत सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामपालिका प्रशासनाने कोरोना काळात केलेल्या निस्वार्थ सेवा केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्यात आले.तसेच गरोदर मातांची तपासणी, त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधा,महिलांच्या शस्रक्रिया ,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरू असलेल्या उपचार सेवा पद्धती याबाबत सरपंच श्री. किरण अहिरे,उपसरपंच श्री. बापुराज खरे,जेष्ठ नेते श्री. यशवंत बापू अहिरे,आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत देण्यात येणाऱ्या सेवेबद्दल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.
– यावेळी डॉ.अभिजित गायकवाड यांच्या वडिलांच्या दुखत निधन झाल्याबद्दल त्यांना सामुहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.आरोग्य सेवक श्री.देवरे नाना यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.यावेळी शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच् प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले.
– या बैठकीला सरपंच श्री.किरण अहिरे, उपसरपंच श्री.बापुराज खरे,जेष्ठ नेते श्री.यशवंत बापू अहिरे,माजी पंचायत समिती सदस्य श्री.अतुलनाना अहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल खरे,श्री.दगा अण्णा अहिरे,श्री.निंबा कृष्णा अहिरे,आरोग्य साहाय्यक श्री.सुभाष देवरे ,श्री.अंबादास जेजुरकर, कनिष्ठ सहाय्यक शमीम शब्बीर बोहरी मॅडम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती सुरेखा बागुल,आरोग्य सेविका श्रीमती रविना पाडवी,श्रीमती सीमा गावित,आरोग्य सेवक श्री.समाधान मोरे,महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षक श्रीमती निकम मॅडम,आशा सुपरवायझर श्रीमती गीतांजली काळे,श्रीमती स्नेहल लोखंडे, अंगणवाडी सेविका श्रीमती नीता अहिरे,संगणक परिचालक कुणाल बच्छाव तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button