Bollywood

?️ प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी तरुणांसाठी आदर्श…

?️ प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी तरुणांसाठी आदर्श...

बॉलिवूड
नर्गिस ही सुनिल दत्त यांच्या प्रेमात होती. पुढ जाऊन त्यांनी लग्न करून सोन्याचा संसारही केला. हे एव्हाना सर्वांना माहिती आहेच. पण नर्गिस व सुनिल यांच्यातील ही लव्हस्टोरीचा प्रवास हा फारच गोड होता. नर्गिस व सुनिल यांच्या प्रेमाचा हा अविस्मरणीय प्रवास…

सुनिल दत्त एकेकाळी सिलोन रेडीयोवर आरजे म्हणून काम करत असत. सुनिल यांचा या काळात अभिनयाशी दूर पर्यंत संबंध नव्हता. मात्र अचानक याच रेडीयोवर त्यांना नर्गिसची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.

नर्गिस यादरम्यान भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून खूप प्रसिद्ध होती. एवढंच नव्हे तर नर्गिस व राज कपूर यांची जोडी पडद्यावर चांगलीच हिट होती. या दिग्गज अभिनेत्रीची मुलाखत घ्यायची म्हणजे खूप जिकरिच काम.

नर्गिस ला पाहून सुनिल खूपच नर्व्हस झाले. आपल्याला काय विचारायचं आहे हेच त्यांना आठवत नव्हतं.या मुलाखतीत एकही प्रश्न त्यांच्या तोंडातून फुटला नाही. ते फारच गोंधळून गेले होते. या प्रकरणाने सुनिल दत्त यांची नोकरी जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

यानंतरच्या काळात सुनील चित्रपटात काम मिळावं म्हणून सेटवर फिरू लागले. बिमल राॅय यांच्या ‘दो बिघा जमिन’ चित्रपटाच शूटींग चालू होत. नर्गिस या चित्रपटात लीड करत होत्या. सुनिलला पाहून त्यांना मुलाखतीचा किस्सा आठवला. नर्गिस गालातल्या गालात हसून निघूनही गेल्या.

नंतर सुनिल यांनी चित्रपटात चांगलाच जम बसवला होता. अन चक्क ‘मदर इंडिया’ या चित्रपटात त्यांना चक्क नर्गिसच्या मुलाचा रोल करायची संधी मिळाली. शूटींग चालू असताना ते नर्गिसला पाहून खूपच नर्वस व्हायचे.

नर्गिसने सुनिल यांना तेव्हा चांगलच सांभाळून घेतलं. अभिनय कसा करावा याची बरच मार्गदर्शनही केल. मात्र अचानक मदत इंडियाच्या सेटवर असा एक किस्सा घडला की नर्गिस या सुनीलच्या प्रेमात पुरती बुडून गेली.

गुजरातच्या एका छोट्या बिलमोर गावात ‘मदर इंडिया’ चा सेट होता. चित्रपटात एका आग लागलेल्या गावाचा सीनच शूटींग करायच होत. म्हणून सेटवर चहूबाजूंनी पाचाड लावण्यात आलं. अन ते पेटवून देण्यात आलं. मात्र अचानक आगीने जरा जास्तच पेट घेतला.

नर्गिस तेव्हा सुनीलच्या बहिणीला घेऊन हाॅस्पिटलमध्ये जात असत. सुनील यांना नर्गिस आधीपासूनच आवडत असत. शेवटी धाडस करून सुनील यांनी नर्गिस यांना प्रपोज केला. नर्गिस यांनीही त्याचा स्वीकार केला.

अगदी नर्गिस यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुनिल हे तिच्यासोबत होते. नर्गिस यांना कॅन्सर झाला आणि तेव्हा सुनिल यांनी तीला जीवापाड जपलं.
सुनिल व नर्गिस यांचं हे निस्वार्थी प्रेम आजच्या तरूणाला नक्कीच आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button