प्रेस नोट
अवैद्य रित्या साग वृक्षांची तोड करून शेतीमध्ये साठवण केलेले जवळपास अंदाजे एक करोड रुपयाचे सागवान वनाधिकार्यांनी केले जप्त……
चंद्रपूर जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही
प्रतिनिधी ज्ञानेशवेर जुमनाके
वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाने वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जाऊन केली कारवाई……
चिमूर तालुक्यातील चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रा अंतर्गत भीसी उपक्षेत्र मधील भिसि ते जामगाव रोड लगत दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता अज्ञात इसमाने खाजगी शेतात जवळपास 12 ट्रॅक्टर साग इमारत व साग बीटांची अवैधरित्या तोड करून साठवण ठेवल्याची गोपनीय माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला मिळताच विशेष पथक प्रमुख रमेश बलैया वन परिमंडळ अधिकारी व आशिष बायस्कर क्षेत्र सहाय्यक भिसी, वनरक्षक आर.पी.आगोसे यांनी मोका स्थळावर जाऊन सदर अवैद्य सागवान जप्त केले घटनास्थळावर कोणीही आरोपीं न भेटल्यामुळे सध्या आरोपीचा शोध घेणे सुरू आहे तसेच घटनास्थळ हे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना श्री बलैया यांनी दूरध्वनीवर संपर्क करून घटनास्थळाची माहिती दिली तेव्हा चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवून रीतसर कार्यवाही करण्याचे आदेश दिले…
सध्या महाराष्ट्रात संचारबंदी लागू असल्याने याचा फायदा घेऊन सागवान तस्करांनी अवैधरित्या साग झाडांची तोड करून त्याची साठवण केल्याचे प्रकरण उघड झाला आहे सदर प्रकरण हे जवळपास एक हप्ता पासून सुरू असल्याचा अंदाज आहे तसेच हे तोड केलेली साग वृक्ष वनक्षेत्रातील आहे ही खाजगी शेतीतील आहे याची माहिती अजून मिळाली नाही आरोपी मिळाल्यानंतर याबाबत खुलासा होईलच
संचारबंदीत शासनाने वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांना वन संरक्षण वन्यजीव संरक्षणाची कामे अधिक प्रभावीरीत्या करण्याचे आदेश असतानाही याप्रकरणात वनविभागाचे वनसंरक्षण कामात दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे या प्रकरणात अवैधरीत्या साग झाडे तोड करून त्याची साठवण करण्यामध्ये वन विभागाचे भीसी उप क्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे ही बाब अतिशय गंभीर असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही होते की नाही यावर हि लक्ष लागले आहे तसेच सदर प्रकरणात सागवान तस्करीत खूप मोठे रॅकेट असण्याचे शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे वनविभागाकडून या प्रकरणात योग्य प्रकारे तपास होईल की नाही योग्य कारवाई केली जाईल का ? याची शाश्वती देता येत नाही
वन विभागाच्या कार्यक्षेत्रात वन विकास महामंडळाचे विशेष पथकाने ही दुसरी केलेली कार्यवाही आहे या अगोदरही अवैधरीत्या साग झाडांची तोड करून वाहतूक करताना एक ट्रॅक्टर जप्त केले आहे .जेव्हा कि वनविकास महामंडळाचे वन संरक्षण पथक आपली कार्यक्षेत्रातील कामे करून वन विभागाच्या क्षेत्रात वनसंरक्षण कामे आहेत ही एक विशेष बाब आहे वनविकास च्या विशेष पथकाकडून आजपर्यंत अनेक अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे परंतु वन विभागाकडून अशा कार्यवाही होत नसल्याने वन विभागाकडे सर्वसामान्य लोकांचे पाहण्याचा दृष्टिकोण बदलत चालला आहे. आज वन विकास च्या विशेष पथकाने केलेल्या कार्यवाही मुळे नक्कीच अवैद्य सांग वृक्षतोड ला नियंत्रण येईलच अशी अपेक्षा आहे . वन विकास विशेष पथक हे पश्चिम चांदा वन प्रकल्प विभाग अंतर्गत वन संरक्षणाची व वन्यजीव संरक्षणाची कामे उत्कृष्टरित्या करत असून वन प्रकल्प प्रमुख विभागीय वनाधिकारी विवेक मोरे, सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋतुराज बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वन संरक्षणाची कामे प्रभावीरीत्या करत आहे






