आरोग्याचा मुलमंत्र
पावसाळी आजार व घ्यायची काळजी
पावसाळा हा ऋतु प्रत्येकाला हवाहवासा वाटतो पण पावसाळा आला की आजारपणही आलंच. मात्र सध्या सर्वजण कोरोना विषाणूशी झुंज देत असताना आता पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे या पावसात जमिनीवर साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे आजार पसरतात. पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात
पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोरायसिस यांसारखे विकारही उद्भवू शकतात. तसेच पावसात श्वसनविकाराची समस्या बळावते. त्यातच आता कोरोना असल्याने आजार वाढण्याची शक्यता अधिक असू शकते. पावसाळ्यात ताप, सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढतात. ही सर्व कोरोनाची लक्षणे आहेत. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
पावसाळ्यातील आजारांवर काबू ठेवायचा असेल, तर
१. समाजाचे आरोग्यशिक्षण अत्यावश्यक.
२. आजाराची लक्षणे दिसल्यास घरी वेळ न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३. गरज भासल्यास वेळच्या वेळी रक्त, लघवीच्या तपासण्या कराव्यात.
४. घाबरून न जाता शांतपणे, व्यवस्थित उपचार करावेत.
५. संयम व विश्रांती महत्त्वाची.
६. अन्न पदार्थ व्यवस्थित धुवून, उकडून, शिजवून खावे.
७. स्वतःचे हात, पाय, अंग कोरडे ठेवावे जेणे करून हिवताप, ज्वर, व चिखल्यानं सारखे आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ






