लोक वर्गणीतून फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल
फैजपूर येथून जवळच असलेल्या पिंपरुड,तालुका यावल येथील जि.प.प्राथमीक शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेतील मुलांना मोफत गणवेश वितरण करण्यात आले, लोक वर्गणीतून शैक्षणिक साहित्य बूट, मोजे,टाय, बेल्ट इतर साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र सुरवाडे ,उपाध्यक्ष तसेच समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य योगिता सुरवाडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे व शिक्षक महेंद्र सुरवाडे व धनश्री महाजन उपस्थित होते नवीन ड्रेस व साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना खुप आनंद झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सलीम तडवी तर आभार शिक्षक महेंद्र सुरवाडे यांनी केले.






