ताकविकी जिल्हा परिषद शाळेचे यश*श्रीराम माळी यांचे विशेष मार्गदर्शन
प्रतिनिधी-सलमान मुल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील ताकविकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या शाळेतील चार विद्यार्थी मी सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेमध्ये यश मिळविले आहे यामध्ये आयेशा पठाण हे खुल्या वर्गातील प्रथम आली आहे तर अनिशा तांबोळी ही इतर मागास वर्गीय विभागातून जिल्ह्यात प्रथम आली आहे तर अनुसूचित जाती जमाती स्वर्गातून स्वरांजलि कांबळे प्रथम आली आहे तर पृथ्वीराज बायस हा खुल्या वर्गातून जिल्ह्यात प्रथम आला आहे
या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्रीराम माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले गेल्या पाच वर्षापासून सातत्याने या शाळेतील विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत यामुळे जिल्ह्यात ताकविकी पॅटर्न तयार झाला आहे.तर शासन दरबारी श्रीराम माळी यांच्या सारख्या शिक्षकांची दखल घेतली पाहिजे असेही यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे पालक वर्गात ही अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर अनेक विद्यार्थी इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषद शाळा तात्विक इकडे वळू लागले आहेत
तर शाळेचे मुख्याध्यापक सी जी कदम ए डी गोरे वाय जी कुंभार व्ही एन जगताप वाय एच शिनगारे एम ए पुरी,ए जे काटकर,डि एन जाधव या शिक्षकांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी गावकऱ्यांनी दिली आहे






