Rawer

तडवी भिल नागरी पुरस्कार गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

तडवी भिल नागरी पुरस्कार गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

रावेर/मुबारक तडवी

तडवी द गाईड ‘भुसावळ या संघटनेचा स्तुत्य उपक्रम
सामजिक आणि पर्यावरणीय चळवळ आयोजित तडवी भिल नागरी पुरस्कार सोहळा २०२२-२३ लोणारी मंगल कार्यालयात मोठ्या थाटात व उत्साहाने दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.संजय बुऱ्हान तडवी होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जहांगीर शावखा तडवी साहेब (उप अभियंता, सां. बां. वि. यावल), श्री. मजित हाजी हमिद तडवी साहेब (वजन मापे, अधिकारी, मुंबई), सौ. मीनाताई राजू तडवी ( प्रथम लोकनियुक्त सरपंच, परसाडे, यावल) आणि श्री असगर मुजात तडवी (सेवानिवृत्त, मुख्य अधिकारी एस बी आय)हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात तडवी समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना तडवी भिल नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात अरहान अशफाक तडवी, अरसलान अशफाक तडवी, ईशल सलीम तडवी, मुस्कान सलीम तडवी, आलिया नत्थु तडवी, अनम आरीफ तडवी या चिमुकल्यांनी आपल्या भाषणाने तडवी समाजातील थोर स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसेवकांच्या आठवणींना उजाळा दिला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १० वी, १२ वीत, पदवी परीक्षा , स्पर्धा परीक्षा, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या समाजबांधवांना ‘तडवी भिल नागरी पुरस्कार २०२३’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तडवी कृती समिती,जळगाव आणि तडवी भिल आदिवासी उत्सव समिती यावल यांचा सामाजिक योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन, सजीव देखावा, पथनाट्य, साजोणी नृत्य,आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या भुसावळ येथील तडवी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अशरफ सुलेमान सर यांच्या आदिवासी चित्रकलेचे ही प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अशफाक जरदार तडवी यांनी तर आभार श्री. मनोज तडवी सर यांनी मानले.
या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तडवी द गाईड संस्था नेहमीच आपल्या वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, वाचनालय,आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन अशा अनेक समाजोपयोगी कार्यासाठी झटत असते.
समाजातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्य ही तडवी द गाईड करत असते. तडवी समाजाला खऱ्या अर्थाने दिशादर्शक आणि गौरवास्पद कार्य तडवी द गाईड टिम करत आहे. या टिमने जागतिक आदिवासी दिनाला यावल येथे सादर केलेले सर्वच कार्यक्रम दाद देण्याजोगे होते. क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर तडवी समाजातील विद्यार्थ्यांना नेण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य या टीमच्या माध्यमातून केले जाते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हमजान पिरखा, अशपाक खलिल, झुल्फिकार लतिफ, किरण जहाबाज, वजीर निजाम, सलीम नशीर, तस्लिम रशीद, हुसेन इब्राहीम, आरीफ बहादूर, याकुब फकिरा, अमीत शरीफ, अमील अय्युब, हैदर उस्मान, जावेद सिराज, सुनील कलींदर, सरवर खुदाबक्ष, निता सुनील, आयेशा अशफाक, हाफिझा सलीम, गुलशन आरिफ, हलीमा वजीर, तनुजा समीर यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button