प्रतिनिधी : मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर
संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असतांना प्रत्येक जण या पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय, पोलिस आणि शासकिय यंत्रणेतील हर घटक जिवाचे रान करून अहोरात्र सेवा देण्यात गुंतलेला आहे. सामान्य नागरिकही सरकारी आदेशांचे तंतोतंत अनुकरण करत आहे.
याच धर्तीवर रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा मानस मनात ठेवून भुसावळ शहरातील *तडवी द गाईड* या तडवी भिल सामाजिक संस्थेच्या सभासदांनी रक्तपेढीत गर्दी न करता दिवसभरात क्रमाक्रमाने जावून स्वैच्छिक रक्तदान करून हा तुटवडा भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केला व इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी डाॅ सलीम बशीर तडवी, किरण जहाबाज तडवी, अकिल साहेबू तडवी, असलम गुलामदस्तगीर तडवी, हैदर उस्मान तडवी, मनोहर झांबरे, संदीप काकडे, सोनू खलील तडवी, आरिफ हुसेन तडवी, शरिफ भिकारी तडवी आणि अशफाक जरदार तडवी यांनी रक्तदान केले.
रक्तदात्यांना कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी मनोज अल्लाउद्दीन तडवी, सलमान इतबार तडवी आणि धन्वंतरी ब्लड बँकेच्या कर्मचारी वर्गाने मार्गदर्शन केले.






