Faijpur

ज्वाज्वल्य इतिहासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद भविष्य घडवावे – प पू महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज

ज्वाज्वल्य इतिहासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद भविष्य घडवावे – प पू महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

आत्मविश्वासाचा, संस्काराचा व पुण्याईचा वारसा नक्कीच मानवी जीवनाला सकारात्मक ऊर्जा व यशोशिखरे प्रदान करीत असतो.
सद्य स्थितीत समाजातील लोकांचा एकमेकांशी तुटलेला संपर्क जोडण्यासाठी निष्कलंक धाम सेतू म्हणून काम करेल व भविष्यकाळात आयुर्वेद, योगा अध्यात्म या माध्यमातून समाज व देशासाठी कार्य करण्याच्या उदात्त हेतूने निष्कलंक धामची स्थापना करण्यात आली आहे. समाजात अनेक प्रतिभा संपन्न लोक आहेत त्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य व मार्गदर्शन केल्याशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही, असे मत आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
फैजपूर येथे महाराणा प्रताप राजपूत संघ, महाराणा प्रताप राजपूत संघर्ष समिती व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट- सेट, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व वैद्यकीय क्षेत्रात उच्चतम कामगिरी करणाऱ्या यशस्वितांचा सन्मान सोहळा वढोदा येथील निष्कलंक धाम येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर चे गादीपती परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडला.
यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ एस डी पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक श्री सुरतसिंग पाटील, श्री दिलीपसिंग पाटील नांदगावकर, डॉ गजानन पाटील, (एम एस , केवल इंडॉस्कॉपी हॉस्पिटल जळगाव) श्री मनोरंजनसिंग राजपूत स्टेशन मास्टर भुसावळ, श्री आर टी पाटील मुख्याध्यापक खडके सिम, श्री दिलीपसिंग पाटील साकेगाव, यासोबत सन्मान सोहळ्याचे संयोजक श्री भगतसिंग पाटील, श्री प्रवीणसिंह पाटील आयोजन समितीचे सदस्य गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी 83 यशस्वितांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बी एन पाटील सर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे औचित्य, उद्देश व उपयोगिता उपस्थितांसमोर अत्यंत सोप्या, सरळ व चित्तभेदक शब्दांमध्ये व्यक्त केले. त्यांनी कार्यक्रमाचे स्थळ निष्कलंक धाम येथेच करण्यामागे समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना देशभरातील आयुर्वेद, योगा व अध्यात्म या क्षेत्रातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू पाहणाऱ्या ठिकाणी करण्याचे औचित्य म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातही आपल्या गुणवत्तेची कस लावून भरीव योगदान देण्यासाठी उद्युक्त करणे असा असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी केवल हॉस्पिटल जळगाव चे संचालक डॉ गजानन पाटील यांनी आपले स्वानुभव व्यक्त करताना, आर्थिक बिकटता, विद्वत्ता व कठोर परिश्रमाच्या आड अजिबात येऊ शकत नाहीत. एकेकाळी आर्थिक परिस्थितीने हतबल असणारा मी योग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाच्या बळावर आज जिल्ह्यातील 90 दवाखान्यात ऑपरेशन करणारा एकमेव डॉक्टर इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असाच आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात येणाऱ्या संधीचे सोने केल्यास यशोशिखरे नक्कीच गाठता येतात असा उपदेश करीत उपस्थितांना भविष्यकाळातील यशासाठी अनेकोनेक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ एस डी पाटील यांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अनुभवातून यशाची गुरुकिल्ली हस्तांतरित केली. निश्चित ध्येय, सूक्ष्म नियोजन व ज्येष्ठांचे मार्गदर्शन यात्रिसूत्रीवर आयुष्यातील कोणतेही ध्येय सहज साध्य करता येते असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सतपंथ चारिटेबल ट्रस्टचे गादीपती परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरण दिनाच्या पूर्वसंध्येला अभिष्टचिंतन करण्यात आले व महाराजांच्या हातून समाज, देश व धर्माची सेवा घडावी अशी प्रार्थना परमेश्वरा चरणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीतील श्री भगतसिंग पाटील, श्री संजयसिंग चव्हाण उपसंपादक, श्री कृष्णा चौधरी, श्री यशवंत काका, श्री अशोक पाटील उपसभापती, श्री प्रवीणसिंह पाटील, श्री सुरतसिंग पाटील, श्री दिलीपसिंग पाटील, श्री कृष्णाजी पाटील यावल, श्री बी एन पाटील सर, श्री संदीप पाटील राणा, श्री सुनील चौधरी, श्री एन एस पाटील सर, श्री अभिजीत पाटील, श्री हर्षल पाटील, श्री विक्की राजपूत, श्री सोनी ठाकूर, श्री गोपीसिंग राजपूत, श्री विलाससिंग राजपूत, श्री हुकुमसिंग पाटील, श्री दिवाणसिंग राजपूत, श्री आर डी पवार सर, श्री हर्षल पाटील श्री पवन पाटील, श्री हेमंत पाटील, सुदर्शन फोटो स्टुडिओ यावल, आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी देशदूत वृत्तपत्र समूहाचे ज्येष्ठ वार्ताहर श्री अरुण होले, दिव्य मराठी चे श्री नंदकिशोर अग्रवाल व 13 तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button