नाशिक मध्ये उद्या पासुन सचांरबदी ची कठोर अमलबजावणी, सातच्या आत आता घरात
नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-:दैनंदिन गरजा भागविण्यासाठी निर्बंध शिथिलतेच्या माध्यमातून नाशिक प्रशासनाने शहरवासीयांना मोकळीक दिली . परंतु बिनधास्त वागणाऱ्या नागरिकांनी नियमांची पायमल्ली केली . त्यामुळे शहरात करोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याच्या निष्कर्षापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचल्या आहेत . करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी सायंकाळी सातनंतर अत्यंत कठोरपणे संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला सायंकाळी सातनंतर अनावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर दिसले , तर त्यांना पोलिसांच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागणार आहे . त्यामुळे सातच्या आत घरात पोहोचण्याचा नियम उद्या ( दि . १ जुलै ) पासून अंमलात आणावा लागणार आहे .
शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी ( दि . ३० सुमारे दोन ते अडीच तास पालकमंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय अधिकारी , आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे , पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील , महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुरेश जगदाळे , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखिल सैंदाणे , महापालिकेचे डॉ . आवेश पलोड यांसह यंत्रणेतील अनेक अधिकारी उपस्थित होते अन्य यंत्रणेच्या बैठकीपूर्वी पालकमंत्री , जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त , जिल्हा | शल्य चिकित्सक यांची सुमारे तासभर बंद दाराआड | धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली . त्यानंतर हे सर्वजण शासकीय विश्रामगृहातील हॉलमध्ये भैटाकीला बसले . लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर शहरातील नागरिकांचे वागणे खूपच बिनधास्त झाले आहे . आपल्याला करोनाचा संसर्ग होणार नाही अशा अविर्भावात सर्व जण वागत आहेत . गर्दी टाळणे , सुरक्षित अंतर राखणे आणि मास्कचा वापर करणे या सरकार आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली नागरिकांकडून सुरू आहे . त्यामुळे शहरात आणि जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाल्याच्या निष्कर्षापर्यंत यंत्रणा आणि आम्ही येऊन पोहोचल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे . आपल्याला काही होत नाही अशा अविर्भावात राहिल्यानेच तरुणांचेही करोना संसर्गामुळे दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासकीय यंत्रणा आल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले .
अत्यावश्यक सेवांसाठी नियम शिथिल शहरातील व्यावसायिक सायंकाळी पाचपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची तयारी दर्शवित आहेत . त्यानंतर दुकाने उघडी ठेवण्याची त्यांची मानसिकता नाही . त्यामुळे सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत कठोर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली . अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण किंवा किरकोळ कामांसाठी रस्त्यांवर , बाजारपेठांमध्ये येणाऱ्या नागरिकांवर पोलिसांद्वारे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे .






