Nashik

नाशिक जिल्ह्यातुन १० आमदार निवडून देत पवारांचे हात मजबूत करा छगन भुजबळांचे आवाहन :

नाशिक जिल्ह्यातुन १० आमदार निवडून देत पवारांचे हात मजबूत करा छगन भुजबळांचे आवाहन :

पक्षीय कामकाजाचा आढावा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे सहा आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून १० आमदार निवडून देऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे हात अधिक बळकट करण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन माजीमंञी नामदार छगन भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, श्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार ना यांचे हात अधिक बळकट करण्याची आता आपल्याला मोठी संधी आहे.. त्यासाठी नगर येथे होत असलेला राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा मेळावा अधिक भव्य व यशस्वी करण्यासाठी मेळाव्यात सर्वाधिक पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातील असावेत. पक्षाची विविध पदे भूषविणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मेळाव्यासाठी योगदान द्यावे. महिला पदाधिकाऱ्यांचादेखील या मेळाव्यात सहभाग असावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.नामदार शरद पवार यांचे नाशिक जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून १० आमदार निवडून देऊन त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या सर्वांना कधीही निवडणुका झाल्या तरी सदैव तयार असायला हवे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वाढीसाठी अधिक योगदान द्यावे असे आवाहन करत देशात महापुरुषांची बदनामी करण्यात येत आहे. या विरोधात आपण जागरूक राहून लढा दिला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगतिले.

बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार शिवराम झोले, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नाना महाले, बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला पदाधिकारी कविता कर्डक, संजय खैरनार, समाधान जेजूरकर, सचिन पिंगळे, गौरव गोवर्धने, ऐश्वर्या गायकवाड, मधुकर मौले, सुरेश आव्हाड, डॉ. अमोल वाजे, बाळासाहेब मते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button