India

10 वी च्या निकालावर सोशल मिडिया वर तुफान टिका.. पहा काय काय आहेत टिका..

10 वी च्या निकालावर सोशल मिडिया वर तुफान टिका..त्या 0.05 वाल्यांना विधानसभेत घ्या ..या आणि अश्या अनेक

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदाच्या परीक्षेत ९९.५ टक्के उत्तीर्ण झाले तर उरलेल ०.०५ टक्के अनुत्तीर्ण ठरवण्यात आलेले आहेत. वर्षभरात काही विद्यार्थी शाळांच्या संपर्कात नव्हते असेच फक्त अनुत्तीर्ण आहेत. एकूण १४०० विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. तर, ४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी, ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे.
मात्र एकीकडे जवळजवळ सगळेच उत्तीर्ण झाले असतानाच ०.०५ टक्के पोरं नक्की आहेत तरी कोण आणि ती एवढी सूट देऊनही नापास कशी झाली यासंदर्भातील मिम्स व्हायरल झालेत. पाहुयात असेच काही मजेदार मिम्स…

त्या 0.05 वाल्या नापास पोरांना विधान सभेवर घ्या

भविष्यात नेते कार्यकर्ते घडविणारा निकाल..

पोरांची जिद्द आणि चिकाटी मात्र अफाट हं कोरोनातही अभ्यास केला..

10 वी च्या निकालावर सोशल मिडिया वर तुफान टिका.. पहा काय काय आहेत टिका..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button