अमळनेर मनसे तर्फे शहरातील रखडलेल्या भुयारी गटारांचे काम पूर्णे करून पादचारी रहदारी रस्ते पूर्ण करण्या बाबत मुख्याधिकारी यांना निवेदन
आम्ही अमळनेर शहरातील त्रस्त नागरिक आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो की, अमळनेर शहरातील अमळनेर नगर परिषद , हद्दीतील अमृत योजने अंतर्गत सुरु असलेल्या भुयारी गटारींचे योजनेचा कामांमुळे चांगले रस्ते नगर परिषद प्रशानाने खड्डे खोदुन चांगले रस्ते खराब केलेले आहेत.नव्हेतर चांगल्या रस्त्यांचे अक्षरशा सत्यानाश झालेला असून त्यामुळे नागरिकांचे आंतोआत हाल होत आहेत.पावसाळ्यात नागरिकांना रहदारीसाठी किंवा वाहन चालकांना तसेच पादचारी रहदारी करत असतांना नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणत हाल होत असतात. तरी महाशयांना विनंती की, नगर परिषद प्रशासनाने कोणताही राजकीय विषय न आणता भुयारी गटारी व रस्त्याचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. नगर परिषद प्रसानाने शासन दरबारी पाठपुरावा करून रस्त्यांचे तसेच भुयारी गटारींचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांचे हाल वाचावावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर तालुकातर्फे कळकळीची नम्र विनंती.निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील काटे शहर अध्यक्ष धनंजय साळुंके धनु भाऊ उपशहर अध्यक्ष दिनेश माने बाळू माने मनसे सैनिक करण पाटील अनिकेत गव्हाणे व आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.






