फायनान्सचे हफ्ते थांबविण्यासाठी कळंब शहरातील महिलांचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब – सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे महिलांचे रोजगार थांबलेले असून सध्या खाण्यापिण्याची सोय नीट होत नाही त्यातून हे फायनान्सचे हफ्ते भरणे खूप कठीण होत असून फायनान्सचे अधिकारी घरी येवून महिलांना त्रास देत आहेत.
अशा आशयाचे निवेदन कळंब शहरातील भीमनगर येथील बचत गटाच्या महिला सभासदांनी तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की , फायनान्स चे अधिकारी फोन लावून पैसे भरा म्हणून जाच करीत आहेत .आता पैसे भरले नाही तर चक्रीव्याज लावून पैसे वसूल करण्याची धमकी देत आहेत.तरी हफ्ते माफ करावे किंवा काही काळासाठी थांबवावेत.
अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.या निवेदनात अरुणा गायकवाड, सुलभा गायकवाड, शितल गायकवाड, सुनंदा गायकवाड,मौसमी बचुटे,अर्चना वाघमारे, शारदा बचुटे,अलका हौसलमल,सुमनबाई हौसलमल,कोमल हौसलमल,रेशमा हौसलमल,आशा हौसलमल आदीसह एकूण सत्तावीस (२७) महिला सदस्यांच्या सह्या आहेत .






