कोल्हापूर (कागल) – तुकाराम पाटील
कोरोना या विषाणूला हद्दपार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोल्हापुरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनी जनता कर्फ्यू आवाहनाला प्रतिसाद देत कागल तालुक्यातील मुरगुड परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील मुरगुड, कुरणी, भडगाव, यमगे, शिंदेवाडी, चिमगाव , दौलतवाडी, निढोरी इत्यादी गावांमध्ये सर्व दुकाने बंद करून तसेच जनतेने घरात राहून हा बंद यशस्वी केला. या बंद मध्ये समाजातील सर्वच घटकांचा समावेश होता, मुरगुड हे परिसरातील वीस ते पंचवीस गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, परंतु नेहमी हजारो लोकांची वर्दळ असणाऱ्या या बाजारपेठेमध्ये आज चिटपाखरू सुद्धा फिरकले नाही. परिसरातील बंद यशस्वी होण्यासाठी
प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे , अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.






