Faijpur

सोशियल सिस्टीम आपल्याला शक्तिमान अन शक्तिहीन ही बनवते- प्रा डॉ गंगाभूषण मोलंकल…

सोशियल सिस्टीम आपल्याला शक्तिमान अन शक्तिहीन ही बनवते- प्रा डॉ गंगाभूषण मोलंकल…

प्रतिनिधी : सलीम पिंजारी

फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित
धनाजी नाना महाविद्यालयात इंटरनल क्वालिटी अश्यूरन्स सेल आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने “जेंडर इक्वलिटी” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार चे आयोजन करण्यात आले. या ऑनलाइन वेबिनार मधे IQAC चे चेअरमन तथा महाविद्यालयचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी उपस्थित होते. IQAC समिती चे कोऑर्डिनेटर उप प्राचार्य डॉ उदय जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आसाम विद्यापीठ, सिलचर येथील समाजकार्य विभागाचे विभाग प्रमुख तसेच एन एस एस. डायरेक्टर प्रा डॉ गंगाभूषण मोलंकल यांनी ‘जेंडर इक्वलिटी’ या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी छोट्या-मोठ्या प्रश्न उत्तरांमधून अतिशय रंजकपणे हा विषय विद्यार्थ्यांच्या मनावर बिम्बवला.

सोशियल सिस्टीम आपल्याला शक्तिमान ही बनवते आणि शक्तीहीन ही बनवते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. याबरोबरच इक्वलिटी आणि इक्विटी याबद्दल विस्तृतपणे माहिती करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ उदय जगताप, डॉ कल्पना पाटील, युवती सभा प्रमुख डॉ सविता वाघमारे, प्रा शिवाजी मगर तसेच IQAC आणि युवती सभा सदस्यानी परिश्रम घेतले. या वेबिनार मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच प्राध्यापक बंधु भगिनी उपस्थिती होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button