Nashik

सोशल डिस्टंसिंग ठेऊन साध्या पद्धतीने विवाह.

सोशल डिस्टंसिंग ठेऊन साध्या पद्धतीने विवाह.

कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये,याकरता राज्यात लॉकडाऊन आहे.त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने पन्नास लोकांमध्ये विवाह लावण्याची परवाणगी दिली आहे.मे महिन्यात ठरलेली बरीचशी लग्न सध्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली आहेत.मात्र निंबोळा ता देवळा येथील संजय सावंत व गावातीलच दिलीप अहिरे यांच्या मुला-मुलींचा विवाह सरकारच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता साध्या पद्धतीने गावातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात पार पाडला.

निंबोळा ता देवळा येथील शेतकरी संजय रामचंद्र सावंत यांचे चिरंजिव प्रशांत व येथीलच दिलीप दौलत आहीरे यांची कन्या हर्षाली यांचा १९ मे रोजी विवाह ठरला होता.मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये,याकरता सार्वजनिक कार्यक्रमाना बंदी घातली असल्याने दोघांही कुंटबियांचा सहमतीने मोजक्या उपस्थितितात विवाह लावण्याचे निच्छित केले.आज १४ रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर विवाह येथील रमेश सावंत यांच्या मळ्यातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात मोजक्या लोकांमध्ये वाजंञी,व ईतर सर्व रूढी व बडेजावास फाटा देत विवाह संपन्न झाला.

लग्न मंदिर परिसरात सॅनेटाइज करत उपस्थिताना सॅनेटाईजर,मास्क पुरवत सोशियल डीस्टन्सिंगचे पालन करत आज अतिशय साध्या पद्धतीने लावण्यात आला.
मोजक्या लोकांमध्ये वाजंञी,व ईतर सर्व रूढी व बडेजावास फाटा देत या शेतकरी दाम्पत्यांच्या छोटेखानी विवाहाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले.
विवाह सोहळ्यास रामचंद्र सावंत,रमेश सावंत,दौलत आहिरे,नानाजी मोरे,भाऊसाहेब आहीरे,राजेंद्र आहीरे,डाॅ सुनिल आहीरे,नंदु आहीरे, प्रभाकर बच्छाव,नंदू शिंदे, प्रवीण शिंदे, पोपट देवरे,मनोहर बिरारी, संदीप गुंजाळ,अक्षय देवरे, सुनील मोरे,दीपक मोरे,खंडु मोरे आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button