Faijpur

थेपडे विद्यालय, म्हसावदचे उपशिक्षक श्री संदीप काशिनाथ भंगाळे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

थेपडे विद्यालय, म्हसावदचे उपशिक्षक श्री संदीप काशिनाथ भंगाळे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथे 23 वर्षापासून कार्यरत असलेले तसेच निंभोरा तालुका रावेर येथील मूळचे रहिवासी श्री.संदीप काशिनाथ भंगाळे यांना 26 जानेवारी 2021 रोजी एरंडोल येथे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील,उपशिक्षणाधिकारी श्री विजय पवार तसेच विविध मान्यवरांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सेवेतील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक तसेच लॉकडाउन काळात केलेले ऑनलाइन काम, विषय ज्ञान वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, गरीब होतकरू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्याची तळमळ, विद्यालयातील सहकारी बंधू-भगिनींना सोबत घेऊन व्यावसायिक कौशल्य वाढविण्याची धडपड, विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन, विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना कार्यक्रमांना उपस्थिती, विषय ज्ञानात पारंगत तसेच चारित्र्यसंपन्न, कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडविण्याची जिद्द अशा विविध बाबींचा विचार करून राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button