Maharashtra

अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात श्री. हर्ष प्रकाशचंद बोथरा कोव्हीड ऑक्सीजन पाईप लाईन लोकार्पण सोहळा संपन्न…

अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात श्री. हर्ष प्रकाशचंद बोथरा कोव्हीड ऑक्सीजन पाईप लाईनचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर तालुक्यातील जनतेस कळविणेत येते की, श्री. हर्ष प्रकाशचंद बोथरा आणिश्री.भरत प्रकाशचंद बोथरा या बंधूंनी त्यांचे वडील कै. प्रकाशचंद भवरलाल बोथरा यांच्या स्मरणार्थ ३० बेडसाठी व पुढील टप्यात ऑपरेशन वार्डात लागणारी ५ एकूण ३५ बेड साठी ऑक्सीजन पाइप लाईन करणेकरिता रक्कम रु.2 लाख रुपये देऊन सामाजिक दायित्व दाखवले.

अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात श्री. हर्ष प्रकाशचंद बोथरा कोव्हीड ऑक्सीजन पाईप लाईन लोकार्पण सोहळा संपन्न...

तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट) व रोटरी क्लब, अमळनेर यांच्या समन्वयाने व मदतीने ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे 30 बेडची ऑक्सीजन पाईल लाईन चे लोकार्पन आज रोजी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे करणेत आले आहे. ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे 30 ऑक्सीजन बेड बसविण्यासाठी मा. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव, श्री. गोरक्षण गाडीलकर, जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व चोपडा येथील शेतकरी चळवळीचे प्रणेते श्री.एस.बी.नाना पाटील यांचे मार्गदर्शनाने तसेच जळगाव जिल्हा रोटरीयन श्री.चंद्रकांत सत्रा व माजी अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांचे सहकार्याने सदरचे कामकाज पुर्ण झालेले आहे.

सदर लोकार्पण सोहळयासाठी मा. आमदार श्री. अनिल भाईदास पाटील, मा.माजी आमदार श्रीमती, स्मिता ताई वाघ, श्रीमती. सिमा अहिरे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग, श्री.मिलिंदकुमार वाघ, तहसलिदार अमळनेर, श्रीमती. विद्या पाटील, मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर, डॉ. ताडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अमळनेर, सिनियर रोटरीयन श्री. चंद्रकांत सत्रा, डॉ. अशिष, डॉ. संदिप जोशी, डॉ. राजेश पाटील, माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट), श्री. तुषार चित्ते, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट), श्री. हर्ष प्रकाशचंद बोथरा, श्री. भरत प्रकाशचंद बोथरा, श्री. संजय इंगळे, उपाध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव (वेस्ट) व श्री. संजय चौधरी, हे उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यात एकुण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 522 असून त्यापैकी बरे होऊन घरी गेल्याची संख्या 386 आहे तसेच मयत 31 आहे. आज एका दिवसात 22 व्यक्तींना घरी पसोडण्यात आले आहे. तसेच पॉझीटीव्ह रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 74% इतकी आहे.

तरी अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस कळविणेत येते की, अनावश्यक बाजारामध्ये गर्दी करु नका, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा घरात रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तहसिलदार मिलिंद कुमार वाघ अमळनेर करीत आहे.
घरात रहा सुरक्षीत रहा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button