अलकवी शिक्षण संस्था आणि ओरिजिनल पत्रकार संघाच्या वतीने सावदा येथील खाजगी उर्दू प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात
युसूफ शाहा सावदा
सावदा : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे मोठा आखाडा आठवडे बाजार परिसरात असलेली अलकवी एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित खाजगी उर्दू प्राथमिक शाळा मध्ये आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शाळा संबंधितांनी व ओरिजिनल पत्रकार संघ सावदा यांनी संयुक्त विद्यामाने शिवजयंती उत्साहाने साजरी केली
सुरुवातीला ओरिजनल पत्रकार संघचे अध्यक्ष युसूफ शाहा व शाळाचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सैय्यद असगर यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस फुल मलाअर्पण, केल्यानंतर उपस्थित सर्व शाळा शिक्षकांनी व पत्रकार बांधवांनी सुद्धा फूल माला अर्पण केले
दरम्यान सचिन सकळकळ, यांनीे छत्रपती शिवाजी महाराज हे खरे जाणते राजे होते त्यांच्या छत्र छायेखाली सगळ्या जाती धर्माचे लोग गुण्यागोविंदाने नांदत होते असे प्रतिपादन केले, पत्रकार फरीद शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांना सोबत घेऊन सर्व धर्मांना समान न्याय देणारे आणि शत्रूला देखील सन्मानाने वागणारे दिलदार प्रजादक्ष् एकमेव राजे असल्याचे मनोगत व्यक्त केले ययावेळी ओरिजनल पत्रकार संघ सावदा चे अध्यक्ष युसूफ शाहा, उपाध्यक्ष कैलास लवंगडे,सल्लागार भानुदास भारंबे ,सदस्य प्रदीप कुलकर्णी , फरीद शेख ,कैलास परदेशी आदी सह शाळेचे मुख्याध्यापक जफर खान सर, असद सर ,सादिक सर ,सद्दाम सर ,शाकीर सर ,दानिश , शिक्षकां नबिला फातेमा उपस्थित होतेस, यापुढे कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण तयार असल्याची गवाई संस्थाध्यक्ष सैय्यद असगर यांनी दिली सूत्रसंचालन दानिश अख्तर सर यांनी केले






