शा पो आ अधिक्षक रावेर यांचे वर जि. प.अध्यक्षांनी दिले तात्काळ कारवाई चे आदेशशालेय पोषण आहार अंतर्गत वाढलेल्या तक्रारींचा रावेर सभापतींनी वाचला पहाडासावदा
प्रतिनिधी युसूफ शाह
अधिकारी चा स्वभाव व त्याची कार्यशैली , संवेदनशीलता , सुजाण पणा , व महत्वाचे म्हणजे त्याच्या पदाला शोभणारी अशी कर्तव्यदक्षता, आपल्या अधिकार क्षेत्रात येणारे कार्य अतिशय चांगल्या व संयमी पणे, सर्वांची समस्यांचा न्याय निपटारा, त्यांचे कडुन होणे फार गरजेचे असते. व या मुळे चुकीचे कार्य करणाय्रांवर त्याचा वचक आहे असे समोर येते. व अश्या कृती चे गुण असलेले, प्रामाणिक व न्याय देणारे अधिकारी महणुन तो परिचित असला पाहिजे. आंणि असे प्रामाणिक व कर्तव्य दक्ष अधिकारी सुध्दा आहे.
परंतु कुणी लाच घेतांना, अपहार, दिरंगाई, कर्तव्यात कसूर, भोंगळ कारभार, चौकशी की ( लपवा लपवी ) , अवैध व्यवसायात भागीदारी, असे विविध प्रकणात लिप्त असलेले बेजबाबदारीचे शिखर गाठुन गंभीर व दखल पात्र प्रकणात सहज भुमिका घेणाय्रा व सरकारी नोकरीत असल्यावर काहीही घडले तरी बदली आणि निलंबना शिवाय बाकी काही घडत नसते .कदाचित अशी वृत्ती ठेवणाय्रा आपल्या सह सर्व डिपार्टमेंट ला बदनाम करणाय्रां अधिकाय्रांची कमी नसून त्या बद्दल कारवाईचया घटना समोर येतात.हे खेद जनक असुन यात भर टाकणारी घटना महणजे रावेर पंचायत समिती शालेय पोषण आहार विभागा बद्दल मोठ्या प्रमाणात शा.पोषण आहार अंतर्गत तक्रारी वाढल्या आहे.याची दखल घेऊन रावेर पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील यांनी तक्रारीचा पहाडा वाचून थेट त्यांच्या कार्यालयाची तोड फोड होउन ही शा पो आ अधिक्षक तडवी वर कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला असता अधिक्षक तडवींचे पदभार काढुन कारवाई करावी अशी मागणी केल्या ने नुकतेच जि.प.जळगांव च्या सर्व साधारण सभेत जि प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी जि. प.प्रशासनावर संताप व्यक्त करून या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी असे आदेश त्यांनी जि. प.प्रशासनाला दिले.
या मुळे
” सावदा येथील अॅगलो उर्दू हायस्कूल मधील शालेय पोषण आहाराचे तांदूळ विक्री प्रकण अंगलट आल्याची चर्चा सुध्दा जोर धरत आहे. ”
व शा.पोषण आहाराचे तांदूळाची स्वतः च्या फायद्या साठी विल्हेवाट लावणाय्रांचे सुध्दा धाबे दणाणले जातील. असे ही बोलले जात आहे.






