Nashik

डोक्यावरील हंडा जमिनीवर: खुंटविहीर मोहपाडा येथे सेवा सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचा उपक्रम. विजय कानडे

डोक्यावरील हंडा जमिनीवर: खुंटविहीर मोहपाडा येथे सेवा सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचा उपक्रम.
विजय कानडे

नाशिक : पाण्याच्या एक एक थेंबा करीता आदिवासी भगिनींची रानावनातील भटकंती थांबायला हवी.- शिल्पा शिंदे
पाण्याच्या एक एक थेंबा करीता आदिवासी भगिनींची रानावनातील भटकंती थांबायला हवी. जीवनभर चाललेला हा पाण्या करीता असलेला संघर्ष स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडून तरी थाबणार का ? असा सवाल सेवा सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा शिंदे यांनी खुंटविहीर मोहपाडा येथील महिलांना पाणी वाहतुक करण्यासाठी संस्थे मार्फत वेल्लो वाॅटर व्हिल ड्रमचे वितरण प्रसंगी केले. यावेळी संस्थेच्या संचालिका मनिषा निकुंभ, प्रियंका भंडारे,शाम चव्हाण, स्वप्नील साळवे जलपरिषद सदस्य शिक्षक रतन चौधरी, अरुण सुबर,पोलीस पाटील मनिराम पाडवी, शिवा धुम, परशराम पाडवी, सावित्री वळवी, यशवंत वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना निंकुभ म्हणाल्या की,
पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत संस्थेने
महिलांना सहज रित्या पाणी आणता आले पाहिजे.पाणी हा महिलांच्या अंत्यत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
पाण्या करीता डोंगरद-यात राहणा-या भगिनींना डोक्यावर हंडा घेऊन उन्हा तानाची , विंचू काट्याची पर्वा
न करता
रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून पाण्याच्या शोधात हिंडावे लागते. या करीता संस्थेच्या वतीने पन्नास कुटूंबाला
नीर चक्राचे वाटप करण्यात आले आहे.
महिलांच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा तसेच पाणी करीता सोशावे लागणारे कष्ट, संघर्ष टाळता आला पाहीजे.
कमी वेळात जास्त पाणी आणता यायला हवे कष्टकरी
महिलांचा वेळ वाचला पाहीजे. पाणी डोक्यावर वाहतांना मणक्याचे विकार, पाठदुखी, कंबर, मान, हात पाय दुखणे हि दुखणी टाळता आली पाहिजेत.या हेतूने या गावात वेल्लो व्हॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले.
संस्थे मार्फत आदिवासी भागातील समस्या निवारणा करीता ऑडियो प्रोग्रॅम द्वारे त्यांच्या स्थानिक बोली भाषेत कार्यक्रम एकविले जातात. विचारात प्रगल्भता, परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. आतापर्यंत संस्थेने सहा हजार पेक्षा जास्त गावाला उपक्रम राबविण्यात आले आले आहेत.
यामध्ये आरोग्य, शिक्षण,पाणी, व्यसनमुक्त, दारुबंदी, बालविवाह रोखणे, कृषी माहिती यासह विविध उपक्रम राबविले जातात.
यावेळी यशवंत वाघमारे,धवळू पाडवी, गोविंदा पालवी,जाणू पाडवी,सिताराम वाघमारे,दिपक पवार, सोनिराम वाघमारे, परशुराम वाघमारे आदी उपस्थित होते.

* मोहपाडा हे अतिदुर्गम भागातील पाडा असल्याने विकासा पासून कोसो दुर.
* बाराशे फुट खोल दरीतून पाणी आणावे लागते.
* सहा वर्षा पुर्वी खोल
दरीतून दोन हंडे पाणी दरड चढून आणतांना मोतीराम वाहूट या तत्कालीन सरपंचाचाच मृत्यू झाला होता.

फोटो – खुंटविहीर मोहपाडा ता. सुरगाणा येथे नीर चक्राचे वाटप करतांना संस्थेचे पदाधिकारी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button