Faijpur

फैजपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ नयना चंद्रशेखर चौधरी यांची निवड

फैजपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ नयना चंद्रशेखर चौधरी यांची निवड

फैजपूर — फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड आज दि ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली त्यात यांची उपनगराध्यक्ष पदी सौ नयना चंद्रशेखर चौधरी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
रशीद नसीर तडवी यांनी उपनराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फैजपूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि ८ सप्टेंबर रोजी ऑनलाइन विशेष सभा बोलाविण्यात आली होती या निवडीसाठी काँग्रेस अपक्ष गटाच्या नगरसेविका सौ नयना चौधरी यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने सौ नयना चंद्रशेखर चौधरी यांची उपनगराध्यक्ष पदि बिनविरोध निवड करण्यात आली दरम्यान या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी या ऑनलाईन सभेप्रसंगी व्यासपीठावर यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर,नगराध्यक्षा सौ महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण सभागृहात उपस्थित होते.निवडीचे कामकाज सभा लिपिक सुधीर चौधरी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे,सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी यांनी पाहिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button